'२.०' सिनेमासाठी रजनीकांत नव्हते पहिली पसंती, बॉलिवूडच्या या सुपरस्टारची केली होती निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 20:46 IST2024-03-04T20:45:46+5:302024-03-04T20:46:15+5:30
साऊथचे सुपरस्टार रजनीकांत अक्षय कुमारसोबत '२.०' चित्रपटात दमदार भूमिकेत दिसले होते.

'२.०' सिनेमासाठी रजनीकांत नव्हते पहिली पसंती, बॉलिवूडच्या या सुपरस्टारची केली होती निवड
साऊथचे सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) अक्षय कुमार(Akshay Kumar)सोबत '२.०' (2.0 Movie) चित्रपटात दमदार भूमिकेत दिसले होते. त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. पण फार कमी लोकांना माहित असेल की या चित्रपटासाठी रजनीकांत नाहीत तर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) निर्मात्यांची पहिली पसंती होता. याचा खुलासा खुद्द आमिर खानने केला आहे.
त्याच्या एका चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आमिरने सांगितले होते की, त्याला पहिल्यांदा '२.०' ऑफर करण्यात आली होती. आमिर म्हणाला होता की, मला चित्रपटाची स्क्रिप्ट खूप आवडली आहे आणि मला माहित आहे की तो बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल. पण जेव्हा मी डोळे मिटून विचार केला तेव्हा मला फक्त रजनी सर दिसत होते. आमिरने सांगितले की, मी स्वत:ला त्या भूमिकेत बसवू शकलो नाही. म्हणूनच मी शंकर सरांना सांगितले की मी हा चित्रपट करू शकणार नाही. कारण रजनी सरांची जागा कोणीही घेऊ शकत नाही.
वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आमिर खान शेवटचा लाल सिंग चड्ढा या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात तो करीना कपूरसोबत दिसला होता. आमिरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. त्यामुळे अभिनेता खूप निराश झाला आणि त्याने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला. आमिर खान नुकताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी जामनगरला पोहोचला होता. जिथे त्याने सलमान खान आणि शाहरुख खानसोबत डान्स केला.