रजनीकांत यांचा '२.०' रिलीज होण्याआधीच त्यांनी कमावले ६५ कोटी, कसे ते वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 07:25 AM2018-05-03T07:25:07+5:302018-05-03T13:12:20+5:30
रजनीकांत यांचे दोन चित्रपट रिलीजच्या वाटेवर आहेत. पहिला 'काला' आणि दुसरा ‘२.०’ या दोनही चित्रपट रिलीजसाठी गेल्या काही दिवसांपासून ...
र नीकांत यांचे दोन चित्रपट रिलीजच्या वाटेवर आहेत. पहिला 'काला' आणि दुसरा ‘२.०’ या दोनही चित्रपट रिलीजसाठी गेल्या काही दिवसांपासून अडकले आहेत. या दोनही चित्रपटांनंतर दिग्दर्शक कार्तिक सुभराज यांच्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. ऐवढेच नाही तर या चित्रपटासाठी रजनीकांत यांना ६५ कोटी रुपयांचे मानधन दिले जाणार आहे.
सिफि डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार कार्तिक यांच्या आगामी चित्रपटात काम करण्यासाठी रजनीकांत यांना ६५ कोटींची रक्कम देण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार रजनीकांत या चित्रपटाचे शूटिंग केवळ 40 दिवस करणार आहे आणि यासाठी ते ६५ कोटींचे मानधन आकारणार आहेत. कार्तिक यांच्या नव्या चित्रपटाचे शूटिंग मे महिन्याच्या अखेरिस होणार आहे.
या चित्रपटाचे शूटिंग रजनीकांत यांच्या ‘२.०’ या चित्रपटाच्या पोस्ट-प्रोडक्शनमुळे अडकले आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकांचे प्रयत्न आहेत की लवकरता लवकर चित्रपटाच्या सीजीआयचे काम पूर्ण करायचे आहे. एस. जयशंकर दिग्दर्शित ‘२.०’ हा चित्रपट मानव आणि जेनेटिक इंजिनियरिंग यांच्यातील युद्धावर आधारित आहे. या अगोदर याच मुद्द्यावर आधारित रजनीकांत यांचा ‘रोबोट’ हा चित्रपट आला होता. त्याचाच हा सीक्वल आहे. ‘रोबोट’ला प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती मिळाली होती. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यामुळे ‘२.०’बद्दलही जबरदस्त अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. या चित्रपटात रजनीकांत यांना बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार टक्कर देताना दिसणार आहे. या चित्रपटाचे बजेट ४०० कोटींपेक्षा अधिक आहे. याचित्रपटाचे डिस्ट्रीब्यूशन राईट्स जवळपास 16 कोटींना विकण्यात येत आहेत. चित्रपटात अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्याशिवाय त्याचबरोबर एमी जॅक्सन, सुधांशू पांडे आणि आदिल हुसेन यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट 7 हजार स्क्रिनवर रिलीज करण्यात येणार आहे.
ALSO READ : ‘काला’चे पहिले गाणे रिलीज; रजनीकांतच्या स्टाइलवर व्हाल फिदा!