रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाला पत्नी लताचा ग्रीन सिग्नल!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 09:40 AM2017-10-06T09:40:13+5:302017-10-06T15:25:39+5:30
तामिळ इंडस्ट्रीतील महानायक रजनीकांत लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहेत. मात्र याबाबतचा अद्यापर्यंत त्यांच्याकडून कुठलाही निर्णय ...
त मिळ इंडस्ट्रीतील महानायक रजनीकांत लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहेत. मात्र याबाबतचा अद्यापर्यंत त्यांच्याकडून कुठलाही निर्णय घेतला गेला नसल्याने, ते राजकारणात केव्हा प्रवेश करतील याविषयीची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे. शिवाय त्यांची पत्नीही त्यांच्या या नव्या इनिंगविषयी उत्सुक आहे. रजनीकांतच्या पत्नी लता यांनी सांगितले की, ते राजकारणात येण्याचा निर्णय केव्हा जाहीर करतील याविषयी आम्हाला उत्सुकता आहे. त्याचबरोबर लता यांनी हेदेखील स्पष्ट केले की, जर ते राजकारणात आले तर त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे.
लता यांनी एका कार्यक्रमात पती रजनीकांत राजकारणात येण्याच्या प्रश्नावर थेट उत्तर दिले. लता यांच्या या उत्तरामुळे रजनीकांत लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. लता यांनी म्हटले की, अधिकृत घोषणा करण्याचा सन्मान त्यांनाच (रजनीकांत) देणे अपेक्षित आहे. ते एकटेच याविषयीचा निर्णय घेतील, आम्ही फक्त एक परिवार म्हणून त्यांच्या निर्णयाचा आदर करणार आहोत. त्यामुळे आम्हाला सर्वांनाच उत्सुकता लागली की, ते याबाबतचा निर्णय केव्हा घेणार.
दरम्यान, रजनीकांत यांनी नुकत्याच पार पडलेल्या एका जाहीर कार्यक्रमात राजकारणात येण्याचे संकेत दिले. त्यांनी म्हटले होते की, सध्याच्या व्यवस्था पूर्णपणे पोखरली आहे. त्यामुळे मी माझ्या प्रशंसकांना अपील करतो की, जर युद्ध करण्याची वेळ आली तर तुम्ही सर्वांनी तयार रहावे. रजनीकांत यांचे हे सांकेतिक वक्तव्य राजकारणाच्या दिशेने असून, ते लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करतील असेच एकूण दिसत आहे.
काही दिवसांपासून अभिनेते कमल हासन हेदेखील राजकारणात येण्याची चर्चा रंगत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वीच कमल यांची भेट घेतली होती. जर कमल यांनी राजकारणात प्रवेश केला, तर दक्षिणेतील हे दोन सुपरस्टार तेथील राजकीय परिस्थिती बदलून टाकतील यात शंंका नाही.