सुशांत आत्महत्या प्रकरणी राजीव मसंदची होणार चौकशी, त्याच्या सिनेमांना निगेटिव्ह रेटिंग दिल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 12:13 PM2020-07-21T12:13:22+5:302020-07-21T12:13:55+5:30

चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांना सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले आहे.

Rajiv Masand to be questioned in Sushant suicide case, allegations of giving negative ratings to his movies | सुशांत आत्महत्या प्रकरणी राजीव मसंदची होणार चौकशी, त्याच्या सिनेमांना निगेटिव्ह रेटिंग दिल्याचा आरोप

सुशांत आत्महत्या प्रकरणी राजीव मसंदची होणार चौकशी, त्याच्या सिनेमांना निगेटिव्ह रेटिंग दिल्याचा आरोप

googlenewsNext

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे. वांद्रे पोलिस बारकाईने या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान आता अशी माहिती मिळते आहे की चित्रपट समीक्षक राजीव मसंदला चौकशीसाठी बोलवले आहे.

चित्रपट समीक्षक राजीव मसंदला सुशांत आत्महत्या प्रकरणी चौकशीसाठी 21 जुलैला पोलिस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले आहे. असे म्हटले जात आहे की राजीव मसंद यांनी सुशांतवर निगेटिव्ह आर्टिकल लिहिले होते. सोबतच त्याच्या सिनेमांना निगेटिव्ह रेटिंग दिले होते. असे वृत्त आहे की राजीवने काही लोकांच्या सांगण्यानुसार सुशांतच्या चित्रपटांना निगेटिव्ह रेटिंग्स दिले होते. या संदर्भात चौकशी करण्यासाठी राजीव मसंद यांना बोलवण्यात आले आहे. या चौकशीत माहिती पडेल की या आरोपात किती तथ्य आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत बऱ्याच लोकांची चौकशी केली आहे. पोलीस लवकरच सुशांतच्या आत्महत्ये मागचे कारण स्पष्ट करतील, अशी आशा व्यक्त करत आहेत.

तर दुसरीकडे सोशल मीडियावर सुशांत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी जोर धरताना दिसत आहे. सुशांतच्या चाहत्यांशिवाय बॉलिवूडमधील काही सेलिब्रेटींनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

Read in English

Web Title: Rajiv Masand to be questioned in Sushant suicide case, allegations of giving negative ratings to his movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.