ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत राजकुमार हिरानी, 'या' चित्रपटांनी केली रेकॉर्ड ब्रेक कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 05:37 PM2023-11-02T17:37:26+5:302023-11-02T17:51:15+5:30

एखादा चित्रपट यशस्वी होते तेव्हा पहिले श्रेय अभिनेता आणि अभिनेत्रीला दिले जाते. पण चित्रपटाच्या यशाचे खरे मास्टरमाईंड हे पडद्यामागे असतात.

Rajkumar Hirani is famous for blockbuster movies | ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत राजकुमार हिरानी, 'या' चित्रपटांनी केली रेकॉर्ड ब्रेक कमाई!

ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत राजकुमार हिरानी, 'या' चित्रपटांनी केली रेकॉर्ड ब्रेक कमाई!

चित्रपट हिट-फ्लॉप होणे ही नित्यनियमाची बाब आहे. एखादा चित्रपट यशस्वी होते तेव्हा पहिले श्रेय अभिनेता आणि अभिनेत्रीला दिले जाते. पण चित्रपटाच्या यशाचे खरे मास्टरमाईंड हे पडद्यामागे असतात. अर्थातच ते दिग्दर्शक असतात. बॉलिवूडमध्ये असेच एक दिग्दर्शक आहेत. ज्यांनी एकही फ्लॉप चित्रपट दिलेला नाही. इतक नव्हे तर या दिग्दर्शकाने केलेले सर्व चित्रपट सुपरहिट नव्हे तर ब्लॉकबस्टर ठरले आहेत. तर हे दुसरे तिसरे कोणी नसून राजकुमार हिराणी आहेत. 

राजकुमार हिरानीच्या 'डंकी' चित्रपटाची सगळीकडे सध्या चर्चा सुरु आहे.  या चित्रपटाचा टीझर आज शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त शेअर करण्यात आला आहे. दमदार टीझर पाहिल्यानंतर चाहते आता सिनेमाची वाट पाहत आहेत. टीझरमधूनच हिराणी यांच्या दिग्दर्शनाची जबरदस्त झलक दिसत आहे. अशातच आता राजकुमार हिरानी यांनी आतापर्यंत दिग्दर्शित केलेल्या टॉप हिट चित्रपटांची यादी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

2003 मध्ये राजकुमार हिरानी यांनी संजय दत्त स्टारर 'मुन्ना भाई एमबीबीएस' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन करिअरला सुरुवात केली. मुन्ना भाई M.B.B.S बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.  त्यावेळी या चित्रपटाने कमी बजेटमध्ये 23 कोटींहून अधिक कमाई केली होती आणि चित्रपटाला अनेक फिल्मफेअर आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाले. यानंतर 'मुन्ना भाई एमबीबीएस'च्या यशानंतर राजकुमार हिरानी आणि संजय दत्तची जोडी 2006 मध्ये 'लगे रहो मुन्ना भाई' या सिनेमात दिसली. हा चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरला.


'थ्री इडियट्स' या सिनेमाद्वारे सुपरस्टार आमिर खानने पहिल्यांदा हिरानीसोबत काम केले. 'थ्री इडियट्स'ने आपल्या शानदार कथेने सर्वांना प्रभावित केले. या चित्रपटाद्वारे राजकुमार हिराणी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांमध्ये सामील झाले. 3 इडियट्सने 2009 मध्ये बॉक्स ऑफिसवर 202 कोटींचा व्यवसाय केला होता.

संजय दत्तप्रमाणेच राजकुमार हिरानीची आमिर खानसोबतची जोडीही हिट आहे. या दोघांचा चित्रपट 'पीके' हा 2014 साली मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. पीकेने बॉक्स ऑफिसवर ३४० कोटींहून अधिक कमाई करून  नवा अध्याय रचला. 

एकामागून एक हिट चित्रपट दिल्यानंतर 2018 साली राजकुमारी हिराणीने सुपरस्टार संजय दत्तचा बायोपिक 'संजू' रिलीज केला. या चित्रपटात रणबीर कपूर संजय दत्तच्या भूमिकेत दिसला होता.परिस्थिती अशी होती की हिरानीच्या संजूनेही अफाट यश मिळवले आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 342 कोटींचे कलेक्शन केले होते. 

Web Title: Rajkumar Hirani is famous for blockbuster movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.