सलमान खान आणि शाहरुख खानला घेऊन सिनेमा बनवणार होते राजकुमार हिरानी, किंग खानने दिला नकार
By गीतांजली | Updated: October 16, 2020 13:14 IST2020-10-16T12:51:03+5:302020-10-16T13:14:45+5:30
शाहरुख खनाचा झिरो सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर त्याचा एकही सिनेमा आला नाही.

सलमान खान आणि शाहरुख खानला घेऊन सिनेमा बनवणार होते राजकुमार हिरानी, किंग खानने दिला नकार
शाहरुख खनाचा झिरो सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर त्याने एकही सिनेमा केला नाही. रिपोर्टनुसार शाहरुख खानला राजकुमार हिरानी यांच्या सिनेमात काम करायचे आहे. राजकुमार हिरानी यांचे सिनेमा प्रेक्षकांना आवडतात. मिळालेल्या माहितीनुसार राजकुमार हिरानी सध्या स्क्रिप्ट लिहिण्यात व्यस्त आहेत. ते सतत स्क्रिप्ट लिहून शाहरुख खानला सांंगतायेत. किंगना खान त्यांना काही सूचना देखील देतो आहे.
मीडिया रिपोर्टनुसार राजकुमार यांनी यापूर्वी एक स्क्रिप्ट लिहिलेली होती ज्यात दोन हिरो असतील. या स्क्रिप्टसाठी हिरानी यांची च्वॉईस शाहरुख खान आणि सलमान खान होते. शाहरुखला ही स्क्रिप्ट आवडली देखील होती. सलमानबरोबरही काम करण्यास त्याला हरकत नव्हती. कदाचित त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला कारण हा चित्रपट यशस्वी झाला असता तर त्याचे श्रेय सलमानला मिळाले असते. कारकीर्दीच्या या टप्प्यावर शाहरुखला असा एखादा चित्रपट करण्याची इच्छा आहे ज्याचे यश केवळ त्याचे असेल. रिपोर्टनुसार हिरानी आता दुसरी स्क्रिप्ट लिहित आहेत. स्क्रिप्ट फायनल होताच किंग खान आणि हिरानी या चित्रपटाची घोषणा करतील.
सलमान आणि शाहरुख खानने आतापर्यंत 'कुछ कुछ होता है', 'करण अर्जुन', 'हम तुम्हारे है' सारख्या सिनेमात एकत्र काम केले आहे. सलमान खानने अलीकडेच त्याचा आगामी सिनेमा 'राधे'चे शूटिंग पूर्ण केले आहे.