राजकुमार-जान्हवीच्या 'Mr and Mrs Mahi' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, पहिल्या दिवशी किती कमावले?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 11:09 AM2024-06-01T11:09:22+5:302024-06-01T11:09:48+5:30

'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमाला प्रदर्शनाच्या दिवशी प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. या सिनेमाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स कलेक्शन समोर आलं आहे.

rajkumar rao janhavi kapoor mr and mrs mahi movie first day collection details | राजकुमार-जान्हवीच्या 'Mr and Mrs Mahi' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, पहिल्या दिवशी किती कमावले?

राजकुमार-जान्हवीच्या 'Mr and Mrs Mahi' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, पहिल्या दिवशी किती कमावले?

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत असलेला 'मिस्टर अँड मिसेस माही' हा सिनेमा अखेर ३१ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट या सिनेमातून मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच राजकुमार राव आणि जान्हवी कपूर ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी 'मिस्टर अँड मिसेस माही' पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. 

'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमाला प्रदर्शनाच्या दिवशी प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमाचे शो हाऊसफूल झालेले पाहायला मिळाले. 'सिनेमा लव्हर्स डे'चा देखील सिनेमाला फायदा झालेला पाहायला मिळाला. सिनेमा लव्हर्स डेच्या निमित्ताने ९९ रुपयांत 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमाचं तिकीट उपलब्ध करून देण्यात आलं होतं. याचादेखील सिनेमाला मोठा फायदा झाला. त्यामुळे सिनेमाच्या कलेक्शनमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. 

जान्हवी कपूर आणि राजकुमार रावची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन समोर आलं आहे. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमाने पहिल्या दिवशी ७ कोटींचा बिझनेस केला आहे. या वीकेंडला सिनेमा किती कोटींचा गल्ला जमवतो. याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

क्रिकेटर होण्याची इच्छा असलेल्या मिस्टर माहीला वडिलांमुळे त्याच्या स्वप्नांवर पाणी सोडावं लागतं. पण, त्याची डॉक्टर बायकोही क्रिकेटची चाहती असते. आपलं अधुरं स्वप्न मिस्टर माही बायकोकडून पूर्ण करायचं ठरवतो. आणि मिसेस माहीला क्रिकेटर बनवण्याचं स्वप्न बघतो. माही कपलचा हा प्रवास 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमातून रंजकरित्या दाखविण्यात येणरा आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने केली आहे. तर शरण शर्मा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

Web Title: rajkumar rao janhavi kapoor mr and mrs mahi movie first day collection details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.