राजकुमार राव - जान्हवी कपूरचा 'मिस्टर अँड मिसेस माही' आता घरबसल्या पाहा 'या' ओटीटीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 05:50 PM2024-07-25T17:50:41+5:302024-07-25T17:51:09+5:30

राजकुमार राव - जान्हवी कपूरचा 'मिस्टर अँड मिसेस माही' आता घरबसल्या पाहा तुम्हाला 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणार आहे

Rajkumar Rao Janhvi Kapoor's Mr & Mrs Mahi OTT release netflix india | राजकुमार राव - जान्हवी कपूरचा 'मिस्टर अँड मिसेस माही' आता घरबसल्या पाहा 'या' ओटीटीवर

राजकुमार राव - जान्हवी कपूरचा 'मिस्टर अँड मिसेस माही' आता घरबसल्या पाहा 'या' ओटीटीवर

राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा यावर्षीचा सिनेमा म्हणजे 'मिस्टर अँड मिसेस माही'. या सिनेमाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमीश्र प्रतिसाद मिळाला. ज्यांनी सिनेमा पाहिला त्यांनी सिनेमाच्या युनिक कथेचं कौतुकही केलं. जान्हवी कपूर - राजकुमार राव या दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूप आवडली. आता हा सिनेमा तुम्हाला घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहे.

'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमा या ओटीटीवर रिलीज

राजकुमार राव - जान्हवी कपूरचा 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमा ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. उद्या अर्थात २६ जुलैला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज होणार आहे. शरण शर्मा लिखित हा सिनेमा निखिल मल्होत्रा यांनी दिग्दर्शित केला होता. स्पोर्ट्स ड्रामा असलेला हा लोकप्रिय सिनेमा ओटीटीवर रिलीज होत असल्याने ज्यांना हा सिनेमा थिएटरमध्ये पाहता आला नाही त्यांना घरबसल्या पाहता येईल.

'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमाविषयी

'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमाची कथा एका क्रिकेट वेड्या जोडप्याभोवती फिरताना दिसत. क्रिकेटर होण्याची इच्छा असलेल्या मिस्टर माहीला वडिलांमुळे त्याच्या स्वप्नांवर पाणी सोडावं लागतं. पण, त्याची डॉक्टर बायकोही क्रिकेटची चाहती आहे. आपलं अधुरं स्वप्न मिस्टर माही बायकोकडून पूर्ण करायचं ठरवतो. आणि मिसेस माहीला क्रिकेटर बनवण्याचं स्वप्न बघतो. त्याचा हा प्रवास त्याला कुठल्या दिशेकडे घेऊन जातो? मिसेस माहीला क्रिकेटर बनवण्यात तो यशस्वी होतो का? याची उत्तरं तुम्हाला सिनेमा पाहून मिळतील.

Web Title: Rajkumar Rao Janhvi Kapoor's Mr & Mrs Mahi OTT release netflix india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.