‘बोस’साठी राजकुमार रावने केले अर्ध टक्कल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2017 10:11 AM2017-05-27T10:11:37+5:302017-05-27T15:41:37+5:30

अभिनेता राजकुमार राव त्याच्या भूमिकेसाठी काहीही करण्यास तयार असतो. काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘राब्ता’ या चित्रपटातील ३२४ वर्ष वयाच्या वृद्ध ...

Rajkumar Rao made semi-bald for 'Bose' | ‘बोस’साठी राजकुमार रावने केले अर्ध टक्कल!

‘बोस’साठी राजकुमार रावने केले अर्ध टक्कल!

googlenewsNext
िनेता राजकुमार राव त्याच्या भूमिकेसाठी काहीही करण्यास तयार असतो. काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘राब्ता’ या चित्रपटातील ३२४ वर्ष वयाच्या वृद्ध व्यक्तीचा लुक समोर आला होता. आता त्याने त्याच्या आगामी ‘बोस’ या वेब सिरीजसाठी अर्ध टक्कल केलेला लुक समोर आला आहे. वेब सिरीजचे दिग्दर्शक हंसल मेहता यांनीच याविषयीचे स्पष्टीकरण दिले आहे. 

‘सिटीलाइट’ चित्रपटाचे दिग्दर्शक असलेल्या मेहता यांनी शुक्रवारी एक ट्विट करून त्यात लिहिले की, ‘राजकुमार रावचा सोशल मीडियावर फिरत असलेला नेताजी बोसची झलक दाखविणारा फोटो हा पहिला व अखेरचा नाही. हा परीक्षणसाठी घेतलेला फोटो आहे. कृपया, प्रतीक्षा करा.’ सध्या राजकुमार याचे सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट आलीम हकीम याच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. फोटोमध्ये राजकुमारने अर्ध टक्कल केले आहे. 



राजकुमारने त्याचा हा फोटो शेअर करताना लिहिले की, ‘बोस’साठी मी अर्ध टक्कल केले आहे. आम्ही लवकरच ‘बोस’ची पहिली झलक तुम्हाला दाखविणार आहोत. आतासाठी केवळ फोटोज्. अलीम हकीम तुमचे आभार.’ राजकुमारने एका न्यूज एजंसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, मी एएलटी बालाजी यांच्या वेब सीरिजसाठी केस कापण्यास तयार आहे. ३२ वर्षीय अभिनेता या मालिकेसाठी अभिनेत्री पत्रलेखा हिच्यासोबत पडद्यावर बघावयास मिळणार आहे. यामध्ये पत्रलेखा एका स्वतंत्र विचाराच्या महिलेची भूमिका साकारणार आहे. 

राजकुमार राव आणि हंसल मेहता यांनी २०१४ मध्ये आलेल्या ‘सिटीलाइट’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. सध्या राजकुमार या वेबसिरीज व्यतिरिक्त ‘राब्ता’ या चित्रपटात एका वेगळ्या लुकमध्ये बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात सुशांत सिंग राजपुत आणि कृती सॅनन ही जोडी लीड रोलमध्ये बघावयास मिळणार आहे. 

Web Title: Rajkumar Rao made semi-bald for 'Bose'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.