"काही सीन्स खटकले पण...", राजकुमार रावचं 'अ‍ॅनिमल'वर भाष्य; चाहत्यांनाच दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 11:13 AM2024-08-23T11:13:48+5:302024-08-23T11:14:33+5:30

देवदास सिनेमाशी तुलना करत राजकुमार म्हणाला...

Rajkumar Rao reacts on Animal Movie comapres it with Devdas movie | "काही सीन्स खटकले पण...", राजकुमार रावचं 'अ‍ॅनिमल'वर भाष्य; चाहत्यांनाच दिला सल्ला

"काही सीन्स खटकले पण...", राजकुमार रावचं 'अ‍ॅनिमल'वर भाष्य; चाहत्यांनाच दिला सल्ला

गेल्या वर्षी आलेल्या रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' सिनेमावरुन प्रचंड गदारोळ झाला. कोणाला सिनेमा आवडला तर कोणी त्यावर बरीच टीका केली. किरण राव, कोंकणा सेन, कंगना रणौत, जावेद अख्तर यांनी सिनेमावर निशाणा साधला होता. 'अ‍ॅनिमल' चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि किरण राव यांच्यात तर शा‍ब्दिक खटकेही उडाले होते. आता अभिनेता राजकुमार रावनेही (Rajukumar Rao) सिनेमाविषयी रिव्ह्यू दिला आहे.

राजकुमार राव सध्या 'स्त्री 2' मुळे चर्चेत आहे. याआधी आलेल्या 'श्रीकांत' सिनेमातही राजकुमारचा अभिनय वाखणण्याजोगा होता. नुकतंच त्याने राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी अ‍ॅनिमल सिनेमाविषयी तो म्हणाला, "मला अ‍ॅनिमल आवडला. मला सिनेमा बघताना मजा आली. मला हा सिनेमा खटकला का? तर कदाचित हो काही सीन्समुळे खटकला. पण मी सिनेमा एन्जॉय केला नाही का? तर असं अजिबातच नाबी. मला रणबीर कपूरचा अभिनय खूप आवडला. त्याने अतिशय शानदार परफॉर्मन्स दिला आहे."

तो पुढे म्हणाला, "सिनेमा पाहून लोक प्रेरित होतात. जेव्हा शाहरुख खानचा देवदास आला होता तेव्हाही असंच काहीसं झालं होतं. जर तुम्ही देवदास पाहून खऱ्या आयुष्यात देवदास बनणार असाल तर तुमच्यातच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला समोर एक गोष्ट दाखवण्यात आली आहे की देवदास सारखाही कोणी व्यक्ती असू शकतो. याचा अर्थ तुम्हीही तसेच व्हा असं कोणीही सांगत नाहीए. "

राजकुमार रावचा 'स्त्री 2' नुकताच रिलीज झाला. यामध्ये त्याची 'विकी' ही भूमिका आहे. पहिल्या भागाप्रमाणेच 'स्त्री 2' सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. राजकुमरा-श्रद्धाची केमिस्ट्रीही मजेशीर आहे.  सिनेमाने आतापर्यंत वर्ल्डवाईड तब्बल 400 कोटींची कमाई केली आहे.

Web Title: Rajkumar Rao reacts on Animal Movie comapres it with Devdas movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.