राजकुमार रावची बॉक्स ऑफिसवर पुन्हा हवा! 'श्रीकांत' सिनेमाने ३ दिवसांतच जमवला इतक्या कोटींचा गल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 11:46 AM2024-05-13T11:46:58+5:302024-05-13T11:47:47+5:30

Shrikanth Box Office Collection : राजकुमार रावचा 'श्रीकांत' बॉक्स ऑफिस गाजवतोय! पाहा ३ दिवसांत किती कमावले

rajkumar rao shrikanth movie box office collection day 3 | राजकुमार रावची बॉक्स ऑफिसवर पुन्हा हवा! 'श्रीकांत' सिनेमाने ३ दिवसांतच जमवला इतक्या कोटींचा गल्ला

राजकुमार रावची बॉक्स ऑफिसवर पुन्हा हवा! 'श्रीकांत' सिनेमाने ३ दिवसांतच जमवला इतक्या कोटींचा गल्ला

बॉलिवूडमधील टॅलेंटेड अभिनेता म्हणजे राजकुमार राव. विविधांगी भूमिका साकारून राजकुमार रावने अभिनयाची छाप पाडली. 'श्रीकांत' हा नवा कोरा सिनेमा घेऊन राजकुमार राव प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमातून एका हरहुन्नरी अंध व्यक्तीची गोष्ट मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. अंधत्वावर मात करुन उद्योगपती झालेल्या श्रीकांत बोल्ला यांची प्रेरणादायी कथा या सिनेमातून दाखविण्यात आली आहे. या सिनेमातून राजकुमार रावने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. 

ट्रेलरपासूनच राजकुमार रावच्या 'श्रीकांत'साठी प्रेक्षक उत्सुक होते. त्यामुळेच सिनेमागृहातही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. १० मेला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने तीनच दिवसांत कोट्यवधींची कमाई केली आहे. या सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले असून पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर राजकुमार रावची हवा पाहायला मिळत आहे. 

सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, प्रदर्शनाच्या दिवशी 'श्रीकांत' सिनेमाने २.२५ कोटींची कमाई केली होती. वीकेंडला या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये वाढ दिसून आली. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सिनेमाने ४.२० कोटींचा गल्ला जमवला. तर तिसऱ्या दिवशी ५.५० कोटींचा बिजनेस केला. पहिल्या वीकेंडला या सिनेमाने ९.७० कोटी रुपये कमावले आहेत. राजकुमार रावच्या श्रीकांत सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत ११.९५ कोटींची कमाई केली आहे. 

'श्रीकांत' सिनेमात राजकुमार रावबरोबर ज्योतिका, शरद केळकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर मराठमोळा अभिनेता भरत जाधवही या सिनेमात झळकले आहेत. तुषार हिरानंदानी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

Web Title: rajkumar rao shrikanth movie box office collection day 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.