'स्त्री २' च्या यशानंतर राजकुमार रावने वाढवली फी? अभिनेत्यानेच केलं स्पष्ट; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 12:30 IST2024-11-25T12:29:29+5:302024-11-25T12:30:18+5:30
राजकुमारने त्याची फी थेट ५ कोटी केल्याचं बोललं जात होतं. या चर्चांवर आता राजकुमारनेच स्पष्टीकरण दिलं आहे.

'स्त्री २' च्या यशानंतर राजकुमार रावने वाढवली फी? अभिनेत्यानेच केलं स्पष्ट; म्हणाला...
अभिनेता राजकुमार रावने (Rajkumar Rao) नुकताच 'स्त्री २' हा ब्लॉकबस्टर सिनेमा दिला. सिनेमाने तब्बल ८०० कोटींची कमाई केली. हा यंदाचा सर्वात हिट सिनेमा ठरला. एवढ्या मोठ्या यशानंतर राजकुमार रावने त्याचं मानधन वाढवल्याची चर्चा सुरु झाली. राजकुमारने त्याची फी थेट ५ कोटी केल्याचं बोललं जात होतं. या चर्चांवर आता राजकुमारनेच स्पष्टीकरण दिलं आहे.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत राजकुमार राव म्हणाला, "मी मानधन वाढवल्याच्या ज्या चर्चा सुरु आहेत त्यात काहीच तथ्य नाही. मी मानधनात अजिबातच वाढ केलेली नाही. निर्मात्यांवर दबाव टाकायला मी इतका मूर्ख नाही. मानधन एक वेगळी गोष्ट आहे जे सिनेमापेक्षा मोठं होऊ शकत नाही. सिनेमाच्या यशानंतर मानधन वाढवलंच पाहिजे हे गरजेचं नाही."
राजकुमारने स्पष्टीकरण देत सर्व अफवांचं खंडन केलं आहे. २०२४ हे वर्ष राजकुमारसाठी खूप खास ठरलं.'स्त्री २' शिवाय त्याचा 'मिस्टर अँड मिसेस माही','श्रीकांत, 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' हे चित्रपटही प्रदर्शित झाले. सर्व सिनेमांमधील त्याच्या कामाचं कौतुक झालं. आता तो आगामी 'मालिक' या सिनेमात दिसणार आहे. याच्या रिलीज डेटची अद्याप घोषणा झालेली नाही. सिनेमातील राजकुमारचा फर्स्ट लूक आला आहे.