म्हणून राजकुमार रावने मानले आईचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 04:14 PM2019-02-08T16:14:57+5:302019-02-08T16:26:19+5:30

अभिनेत्री पत्रलेखा गेल्या काही दिवसांपासून तिच्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन चर्चेत आहे. नुकतेच पत्रलेखाने बॉयफ्रेंड राजकुमार रावसोबत एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती.

Rajkumar Rao thankful to his mom fro teach him equality | म्हणून राजकुमार रावने मानले आईचे आभार

म्हणून राजकुमार रावने मानले आईचे आभार

googlenewsNext
ठळक मुद्देपत्रलेखा पॉल 'व्हेअर इज माय कन्नडका' या कानडी सिनेमात झळकणार आहेहा अॅक्शन कॉमेडी चित्रपट असून

अभिनेत्री पत्रलेखा गेल्या काही दिवसांपासून तिच्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन चर्चेत आहे. नुकतेच पत्रलेखाने बॉयफ्रेंड राजकुमार रावसोबत एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. हा कार्यक्रम स्त्री-पुरुष समानता या विषयावर आधारित होता. यावेळी बोलताना राजकुमार म्हणाला, ''माझ्या आईने घरात मला आणि माझ्या बहिणींना लहानपणापासून समानतेचे धडे दिले.  घरातील कामं माझ्या बहिणींसोबत मीदेखील करायचो. त्यामुळेच कदाचित मी आणि पत्रलेखाचे नातं सर्व पातळीवर समानतेचे आहे. आईने घरातच स्त्री-पुरुष समानतेची शिकवण दिल्याने राजकुमाराने त्याच्या आईचे आभार मानले. या विषयावर बोलताना पत्रलेखा म्हणाली, ''राजकुमार आणि मी दोघेही कोणत्याही काम एकत्र करतो. आम्ही खऱ्या अर्थाने समान जोडीदार आहोत, हे तो फक्त बोलत नाही तर तसा वागतोदेखील. काही दिवसांपूर्वी पत्रलेखाने एका सामाजिक संस्थेला भेट देऊन तिथल्या मुलांशी संवाद साधला होता. 

पत्रलेखा पॉल 'व्हेअर इज माय कन्नडका' या कानडी सिनेमात झळकणार आहे. हा अॅक्शन कॉमेडी चित्रपट असून यात ती लोकप्रिय अभिनेता गणेशसोबत दिसणार आहे. एप्रिल महिन्यात या सिनेमाचे शूटिंग सुरु होणार असून बहुतांश सीन्स हे इंग्लंडमध्ये शूट होणार आहेत. 'व्हेअर इज माय कन्नडका' चित्रपटाची कथा, पटकथा, स्टारकास्ट आणि प्री-प्रोडक्शन असे सगळे काही जुळून आले असून यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात इंग्लंडमध्ये संपूर्णतः शूट होणार आहे.

या वर्षाअखेरीस सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी निर्माते प्रयत्नशील असतील. कन्नड आणि हिंदीमधील अनेक टेलिव्हिजन शोजचे दिग्दर्शन केलेल्या राज आणि दामिनी ही नवरा बायकोची जोडी पत्रलेखाच्या या आगामी सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. 
 

Web Title: Rajkumar Rao thankful to his mom fro teach him equality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.