राजकुमार रावच्या 'सिटीलाइट्स'चा सिक्वल येणार !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 12:41 PM2017-11-24T12:41:18+5:302017-11-24T18:11:18+5:30

हंसल मेहतांची फिल्म 'सिटीलाइट्स'चा सिक्वल येणार असल्याची माहिती स्वत: फिल्मचा लीड अ‍ॅक्टर राजकुमार रावने दिली आहे. एका खास मुलाखतीत ...

Rajkumar Rao's 'Citylights' sequel to come! | राजकुमार रावच्या 'सिटीलाइट्स'चा सिक्वल येणार !

राजकुमार रावच्या 'सिटीलाइट्स'चा सिक्वल येणार !

googlenewsNext
सल मेहतांची फिल्म 'सिटीलाइट्स'चा सिक्वल येणार असल्याची माहिती स्वत: फिल्मचा लीड अ‍ॅक्टर राजकुमार रावने दिली आहे. एका खास मुलाखतीत राजकुमार रावने सांगितले, की त्याची फार पूवीर्ची गर्लफ्रेंड पत्रलेखा आणि दिग्दर्शक हंसल मेहता 'सिटी लाइट्स' नंतर वेब सीरिज 'बोस'मध्येही सोबत काम करत आहेत. मेहतांसोहत एवढे काम करत आहे की आता त्यांच्यासोबत फॅमिली रिलेशन तयार झाले आहे. 
हंसल मेहता आणि राजकुमार राव यांच्यातील बाऊंडिंग दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे. सिटीलाइट्स नंतर या फिल्मचा सिक्वेल करण्याचा विचार ही दुकली करत आहे. त्यासोबतच भारतीय स्वातंत्र्यासाठी महत्त्वाचे कार्य करणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारीत 'बोस' ही वेबसीरीजही मेहता आणि राजकुमार राव करत आहेत.   
- मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार राव सध्या स्क्रिप्टचे वाचन करत आहे. ही फिल्म तिघांच्याही फार जवळची आहे. त्यामुळे त्यांची इच्छा आहे की ही कथा पुढे सरकली पाहिजे. 
- राजकुमार रावचे म्हणणे आहे, की सिटी लाइट्स ही फिल्म एवढी चांगली असूनही अंडररेटेड राहिली आणि बॉक्स आॅफिसवरही तिला सक्सेस मिळाला नाही. 
- सिटीलाइट्सचा सिक्वल कुठून सुरु होणार याबद्दल राजकुमारने काही सांगितले नाही. तो म्हणाला की स्क्रिप्ट लॉक झालेली नाही. ती फायनल झाल्यानंतरच त्याबद्दल काही सांगता येईल. 
- सिटीलाइट्सच्या सिक्वलमध्ये जुनीच स्टारकास्ट पुन्हा दिसण्याची शक्यता अधिक असल्याचे संकेत मात्र राजकुमार रावने दिले. 
- सिटीलाइट्समध्ये राजस्थानी युवकाची भूमिका साकारण्यासाठी त्याने राजस्थानी संस्कृतीचा फार बारकाईने अभ्यास केला होता. या फिल्मसाठी त्याने प्रादेशिक भाषेचा ढंग आणि लहेजाही आत्मसात केला होता. 
- २०१४ मध्ये प्रदर्शित सिटीलाइट्समध्ये रोजगाराच्या शोधात राजस्थानचा एक तरुण मुलगी आणि पत्नीसह मुंबईत येतो. हंसल मेहताची ही फिल्म मुकेश भट्टने प्रोड्यूस केली होती. असे म्हटले जाते की ही फिल्म ब्रिटीश मुव्ही 'मेट्रो मनीला'ची रिमेक होती. 

Web Title: Rajkumar Rao's 'Citylights' sequel to come!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.