​राजकुमार रावच्या ‘न्यूटन’चा वर्ल्ड प्रीमिअर होणार बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2017 08:01 PM2017-01-19T20:01:07+5:302017-01-19T20:01:07+5:30

अभिनेता राजकुमार रावने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये खास ओळख निर्माण केली आहे. राजकुमार रावचा आगामी ‘न्यूटन’ या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर ...

Rajkumar Rao's Newton's World Premiere will be held at the Berlin Film Festival | ​राजकुमार रावच्या ‘न्यूटन’चा वर्ल्ड प्रीमिअर होणार बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये

​राजकुमार रावच्या ‘न्यूटन’चा वर्ल्ड प्रीमिअर होणार बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये

googlenewsNext
िनेता राजकुमार रावने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये खास ओळख निर्माण केली आहे. राजकुमार रावचा आगामी ‘न्यूटन’ या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०१७ मध्ये करण्यात येणार आहे. न्यूटन या चित्रपटात राजकुमार राव एका क्लर्कच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ब्लॅक कॉमेडी असल्याचे सांगण्यात येत आहे. वर्ल्ड प्रीमिअरची माहिती राजकुमार रावने ट्वीट करून दिली. 

राजकुमार राव याची प्रमुख भूमिका असलेल्या न्यूटन या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित मासुरकर याने केले आहे. हा चित्रपट ब्लॅक कॉमेडी आहे. या चित्रपटात राजकु मार राव एक क्लर्क असून त्याला छत्तीसगढमध्ये इलेक्शन ड्युटीसाठी पाठविले जाते. माओवादी व नक्षलग्रस्त भागात असलेल्या सर्व अडचणींचा सामना करीत तो निष्पक्ष निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न करतो. या चित्रपटाचे पोस्टर शेअर करीत या चित्रपटाचे बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड प्रीमिअर आयोजित करण्यात आले असून यासाठी चित्रपटाच्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे. 

 
या चित्रपटाबद्दल माहिती देताना राजकुमार राव म्हणाला, हा चित्रपटाची कथा एका सामान्य मानसाची आहे. तो जंगलात नक्षलवाद्यांसोबत राहून आपले जीवन कसे व्यतित करतो हे दाखविण्यात आले आहे. मी चित्रपटांच्या कथा वाचतो आणि विचारपूर्वक निवड करतो. मी आखो देखी आणि मसान या चित्रपटाचे निर्माता मनीष मुद्रा यांच्या संपर्कात होतो. त्यांनी जेव्हा या चित्रपटाची कथा वाचली तेव्हा त्यांना हाच योग्य चित्रपट आहे असे वाटले. यामुळे मी या चित्रपटाचा भाग झालो. चित्रपटाच्या माध्यमातून मी वेगवेगळे रोल करू इच्छितो आणि आपली भूमिका करण्यासाठी त्याचे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. Read More : सुशांतसिंग म्हणतो,‘ काय पो चे ’ एक जादुई अनुभव!

६७ वा वर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ९ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. क्वीन व अलिगढ या चित्रपटातील राजकुमार राव यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत. 

Realted Articale : 
‘आता मी समलैंगिक व्यक्तिंचे दु:ख समजू शकतो’

Web Title: Rajkumar Rao's Newton's World Premiere will be held at the Berlin Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.