OMG! वर्षाच्या सुरुवातीलाच राजकुमार-रकुलला ‘जोर का झटका’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 08:00 AM2020-01-02T08:00:00+5:302020-01-02T08:00:02+5:30

अभिनेता राजकुमार रावने गतवर्षात ‘स्त्री’ सारखा सुपरडुपर हिट सिनेमा दिला. पण त्याची नव्या वर्षाची सुरुवात मात्र काहीशी अनपेक्षित ठरली.

Rajkummar Rao and Rakul Preet Singh movie shimla mirchi will not be a theatrical release will stream on ott | OMG! वर्षाच्या सुरुवातीलाच राजकुमार-रकुलला ‘जोर का झटका’!!

OMG! वर्षाच्या सुरुवातीलाच राजकुमार-रकुलला ‘जोर का झटका’!!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘शिमला मिर्ची’ हा हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलाच्या पार्श्वभूमीवर आधारित एक रोमॅन्टिक चित्रपट आहे.

अभिनेता राजकुमार रावने गतवर्षात ‘स्त्री’ सारखा सुपरडुपर हिट सिनेमा दिला. पण त्याची नव्या वर्षाची सुरुवात मात्र काहीशी अनपेक्षित ठरली. होय, नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच म्हणजे येत्या शुक्रवारी राजकुमारचा ‘शिमला मिर्ची’ हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. पण आता हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार नसल्याचे कळतेय. या चित्रपटात राजकुमार रावसोबत रकुलप्रीत सिंग आणि हेमा मालिनी मुख्य भूमिकेत होते. त्यामुळे ‘शिमला मिर्ची’ चित्रपटगृहांत प्रदर्शित न करण्याचा निर्णय या तिघांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयाचा थेट परिणाम कलाकारांच्या ब्रांडिंगवर होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

शोले, सागर, शान सारखे शानदार सिनेमे बनवणारे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी ‘शिमला मिर्ची’ दिग्दर्शित केला आहे. 24 वर्षांनंतर रमेश सिप्पींनी दिग्दर्शित केलेला सिनेमा प्रदर्शित होणार म्हटल्यावर सगळेच उत्साहित होते. खुद्द रमेश सिप्पीही आनंदात होते. पण चर्चा खरी मानाल तर वितरक न मिळाल्याने ऐनवेळी हा सिनेमा चित्रपटगृहांत प्रदर्शित न करता थेट ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला गेला.

ऐकून आश्चर्य वाटेल पण, ‘शिमला मिर्ची’ हा सिनेमा 2014 मध्ये तयार झाला होता. रमेश सिप्पी आणि त्यांच्या पत्नीने हा सिनेमा बनवला होता. मात्र चित्रपटाला वितरक मिळत नव्हते. यानंतर हा चित्रपट वायकॉम 18 ने खरेदी केला होता. तेव्हापासून हा सिनेमा रिलीजच्या प्रतीक्षेत होता. अखेर 3 जानेवारीला या चित्रपटाला रिलीजचे मुहूर्त मिळाले होते. परंतु त्याआधीच निर्मात्यांनी हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्याचे ठरवले. 
‘शिमला मिर्ची’ हा हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलाच्या पार्श्वभूमीवर आधारित एक रोमॅन्टिक चित्रपट आहे. या चित्रपटात राजकुमार हा रकुलच्या प्रेमात पडतो मात्र तो तिच्याजवळ प्रेमाची कबूली देऊ शकत नाही. त्यामुळे तो तिच्या घरात पत्र टाकतो. मात्र ते पत्र रकुलची आई हेमा मालिनीला मिळते. हेमा मालिनी राजकुमारच्या प्रेमात पडतात व तिथून प्रेमाचा तिहेरी खेळ सुरू होतो, असे याचे ढोबळ कथानक आहे.

Web Title: Rajkummar Rao and Rakul Preet Singh movie shimla mirchi will not be a theatrical release will stream on ott

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.