'स्त्री 2'चाच बोलबाला, मिळाले सर्वाधिक IMDb रेटिंग; सोशल मीडियावरही जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 19:02 IST2024-08-28T19:00:23+5:302024-08-28T19:02:23+5:30
सिनेमा जगतात आयएमडीबी रेटिंग खूप महत्त्वाचे आहे. एखादा चित्रपट पहावा किंवा पाहू नये हे ठरवण्याआधी असंख्य प्रेक्षक त्याला मिळालेला आयएमडीबी रेटिंग तपासतात.

'स्त्री 2'चाच बोलबाला, मिळाले सर्वाधिक IMDb रेटिंग; सोशल मीडियावरही जोरदार चर्चा
अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर स्टारर 'स्त्री 2: सरकटे का आतंक' सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. चित्रपटातील प्रत्येक सीनने प्रेक्षकांना सिनेमाच्या प्रेमातं पाडलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा कपूर आणि सिनेमातील स्टारकास्टची चर्चा रंगली आहे. फक्त लोकांच्या मनातचं नाही तर आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीतही 'स्त्री 2' सिनेमातील कलाकारांनी स्थान मिळवलं आहे.
चित्रपट, टीव्ही आणि सेलिब्रिटी विश्वातील सर्वांत प्रसिद्ध स्रोत असलेल्या IMDb ने लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींची घोषणा केली. यात दुसऱ्या स्थानावर श्रद्धा कपूर आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक या यादीत 11व्या क्रमांकावर आहेत. नायक राजकुमार राव 12 व्या तर अभिषेक बॅनर्जी 19 व्या क्रमांकावर आहे. त्यांच्यासोबत सातव्या क्रमांकावर अक्षय कुमार, 13 व्या क्रमांकावर तमन्ना भाटिया आणि 20 व्या क्रमांकावर अन्या सिंग आहे. या सर्वांनी चित्रपटात विशेष भूमिका साकारल्या आहेत.
'स्त्री 2' बरोबरच 'कल्की 2898 AD' चे कलाकार चित्रपटाच्या OTT रिलीजनंतर पुन्हा यादीत आले आहे. मृणाल ठाकूर, दीपिका पदुकोण, प्रभास, दिशा पटानी, अमिताभ बच्चन, कमल हसन आता अनुक्रमे 5व्या, 6व्या, 8व्या, 9व्या, 18व्या आणि 35व्या क्रमांकावर आहेत. सिनेमा जगतात आयएमडीबी रेटिंग खूप महत्त्वाचे आहे. एखादा चित्रपट पहावा किंवा पाहू नये हे ठरवण्याआधी असंख्य प्रेक्षक त्याला मिळालेला आयएमडीबी रेटिंग तपासतात. जर चित्रपटाला मिळालेलं आयएमडीबी रेटिंग चांगलं असेल तर तो चित्रपट चांगला, असा सर्वसामान्य समज आहे. कारण प्रेक्षकच एखाद्या चित्रपटाला किंवा वेब सीरिजचा ही रेटिंग देतात आणि त्याची लोकप्रियता ठरवतात.