Rajkummar Raoच्या नावावर करोडोंची फसवणूक करण्याचा होता प्लॅन, अभिनेत्याने केलं सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 05:41 PM2022-01-05T17:41:35+5:302022-01-05T17:59:25+5:30

राजकुमार राव(Rajkummar Rao) ही सायबर क्राईमच्या तावडीत सापडला आहे.

Rajkummar rao warns against fake email sent in his name asking for 3 crore rupees | Rajkummar Raoच्या नावावर करोडोंची फसवणूक करण्याचा होता प्लॅन, अभिनेत्याने केलं सावध

Rajkummar Raoच्या नावावर करोडोंची फसवणूक करण्याचा होता प्लॅन, अभिनेत्याने केलं सावध

googlenewsNext

सोशल मीडियाच्या जमान्यात आजकाल अनेकजण सायबर क्राईमला बळी पडतात.यातून बॉलिवूड सेलिब्रिटीही सुटू शकले नाहीत. कधी कुणाचे ट्विटर अकाउंट हॅक होते, तर कधी कुणाचे इन्स्टाग्राम किंवा फेसबुक. आता राजकुमार राव(Rajkummar Rao) ही सायबर क्राईमच्या तावडीत सापडला आहे. राजकुमारच्या नावाच्या बनावट ईमेल आयडीवरून कोट्यवधी रुपये मागितल्याची चर्चा आहे. स्वत: अभिनेत्याने लोकांना सावध करताना सांगितले की, त्याच्या बनावट ईमेल आयडीवरून पैसे मागितले जात आहेत.

राजकुमार राव याने इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याच्या नावाने बनवलेल्या बनावट ईमेल आयडीची माहिती दिली आहे. अभिनेत्याने लिहिले, '#FAKE कृपया अशा बनावट लोकांपासून सावध रहा. सौम्या नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही. हे लोक बनावट ईमेल आयडीचा  वापरून लोकांना मूर्ख बनवत आहेत. राजकुमारने शेअर केलेल्या बनावट ईमेलच्या कॉपीमध्ये अभिनेत्याच्या नावावर चित्रपट करारासाठी ३.१ कोटींची मागणी करण्यात आली आहे.

या सेलेब्सचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले होते.राजकुमारच्या आधी इतर अनेक सेलेब्सही अशा फेक आयडी आणि अकाउंट्समुळे हैराण झाले आहेत. या यादीत श्रुती हसन, स्वरा भास्कर, अमिताभ बच्चन, फराह खान, अमिषा पटेल, उर्मिला मातोंडकर, ईशा देओल यांचा समावेश आहे. या सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्यात आले होते.

वर्कफ्रंटवर, राजकुमार राव याचे सध्या अनेक प्रोजेक्ट पाइपलाइनमध्ये आहेत. यामध्ये बधाई दो, Mob, Mr & Mrs Mahi, HIT- The First Case यांचा समावेश आहे. या चित्रपटांमध्ये तो भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर, सान्या मल्होत्रासोबत दिसणार आहे.
 

Web Title: Rajkummar rao warns against fake email sent in his name asking for 3 crore rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.