राजकुमार रावने लग्नात पत्रलेखाला घातले इतक्या लाखांचे मंगळसूत्र, होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 11:42 AM2021-11-19T11:42:31+5:302021-11-19T11:43:13+5:30
नुकतेच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा पॉल लग्नबेडीत अडकले आहेत.
सेलिब्रेटी म्हटलं की ते वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. कधी त्यांच्या आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी त्यांच्या आउटफिटमुळे. त्यांचे चाहते त्यांची स्टाइल स्टेटमेंट फॉलो करत असतात. त्यात त्यांच्या लग्नाच्या बाबतीत चाहत्यांमध्ये वेगळीच उत्सुकता असते. प्रत्येकजण आपापल्या आवडीनिवडीनुसार लग्नाचे प्लानिंग करत असतो. नुकतेच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा पॉल लग्नबेडीत अडकले आहेत. जवळपास १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी चंडीगढमधील ऑबेरॉय सुख विलास लक्झरी रिसॉर्टमधील कोहिनूर व्हिलामध्ये सात फेरे घेतले आहेत. त्यानंतर आता नुकतेच ते मुंबईत परतले आहेत. त्यावेळी ते विमानतळावर स्पॉट झाले. तिथे सर्वांच्या नजरा नवीन जोडप्यावर खिळल्या होत्या.
नववधूच्या लूकमध्ये पत्रलेखा खूपच सुंदर दिसत होती. यादरम्यान तिने लाल रंगाची साडी परिधान केली होती, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. त्यावेळी राजकुमार रावही पांढऱ्या कुर्ता-पायजमामध्ये खूपच सुंदर दिसत होता. यादरम्यान सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे, पत्रलेखाच्या मंगळसूत्राने.
राजकुमारने लग्नात पत्रलेखाला घातलेले मंगळसूत्र प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी यांच्या कलेक्शनमधील आहे. मोती आणि गोमेदने बनवलेले हे मंगळसूत्र १८ कॅरेट सोन्याचे आहे. त्यात काळे आणि सोनेरी मोती वापरण्यात आले आहेत. मंगळसूत्राच्या किमतीबद्दल सांगायचे तर त्याची किंमतही हैराण करणारी आहे. या मंगळसूत्राची किंमत १ लाख ६५ हजार असल्याचे सांगण्यात येत आहे. पत्रलेखाने तिच्या लग्नात सब्यासाची यांनी डिझाइन केलेला लेहंगा परिधान केला होता. यासोबतच तिने लाल रंगाची ओढणी घेतली होती आणि नाकात सुंदर रिंग आणि कपाळावर बिंदी कुंकू लावले होते. वधूच्या अवतारात पत्रलेखा खूपच सुंदर दिसत होती.