राजपाल यादवला सिनेमा काढणे भोवले, बँकेने सील केली करोडोंची संपत्ती, कुलर ठेवला चालू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 08:53 AM2024-08-13T08:53:38+5:302024-08-13T08:53:59+5:30

Rajpal Yadav Defaulter News: ही संपत्ती कचहरी ओव्हरब्रिजजवळ आहे. ही संपत्ती एका मार्बल विक्रेत्याला भाड्याने दिलेली होती. आता या भानगडीत तो मार्बल विक्रेताही अडकला आहे. बँकेने या संपत्तीच्या मुख्य गेटलाच सील ठोकले आहे.

Rajpal Yadav had to make a movie, the bank sealed the property worth crores, kept the cooler running | राजपाल यादवला सिनेमा काढणे भोवले, बँकेने सील केली करोडोंची संपत्ती, कुलर ठेवला चालू

राजपाल यादवला सिनेमा काढणे भोवले, बँकेने सील केली करोडोंची संपत्ती, कुलर ठेवला चालू

बॉलिवुड अभिनेता राजपाल यादव आर्थिक संकटात सापडला आहे. सिनेमा काढण्यासाठी घेतलेले कर्ज फेडू न शकल्याने राजपाल यादवची करोडोंची संपत्ती बँकेने सील केली आहे. अता पता लापता या सिनेमासाठी राजपालने ही संपत्ती बँकेकडे गहाण ठेवली होती. त्याला सिनेमा काढणे भोवले आहे. 

राजपालने अता पता लापता ही फिल्म काढण्यासाठी २०१२ मध्ये सेंट्रल बँकेकडून कर्ज घेतले होते. राजपालने हा सिनेमा डायरेक्ट केला होता तर त्याची पत्नी राधा यादव ही निर्माता होती. हा सिनेमा बनविण्यासाठी त्याने सर्व काही पणास लावले होते. हा सिनेमा दणकून आपटला आणि राजपाल यादव कर्जबाजारी झाला. 

राजपालने या सिनेमासाठी मुंबईतील बांद्रा येथील सेंट्रल बँकेकडून ५ कोटींचे कर्ज उचलले होते. यासाठी वडिलांच्या नावे असलेली जमीन आणि घर गहाण ठेवले होते. हे कर्ज न फेडता आल्याने आता शाहजहांपूरयेथील त्याची करोडोंची संपत्ती बँकेने जप्त केली आहे. राजपालने ५ कोटींचे कर्ज घेतले होते ते वाढून आता ११ कोटी रुपये झाले आहे, असे सांगितले जात आहे. 

बँकेचे अधिकारी दोन दिवसांपूर्वी मुंबईहून शाहजहांपूरला गेले होते. त्यांनी गुपचूप तिथे बँकेचा बोर्ड लावला आहे. यावर ही संपत्ती मुंबईतील सेंट्रल बँकेची आहे व या संपत्तीबाबत कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू नयेत, अशी नोटीस चिकटविली आहे. ही संपत्ती कचहरी ओव्हरब्रिजजवळ आहे. ही संपत्ती एका मार्बल विक्रेत्याला भाड्याने दिलेली होती. आता या भानगडीत तो मार्बल विक्रेताही अडकला आहे. बँकेने या संपत्तीच्या मुख्य गेटलाच सील ठोकले आहे. यामुळे त्याचा माल आतच अडकला आहे. तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांनी कुलरही बंद केलेले नाहीत, ते तसेच चालू राहिले आहेत. 

राजपाल कर्जबुडवा...

मुरली प्रोजेक्ट्स या दिल्लीस्थित कंपनीने राजपाल यादव यांच्या 'श्री नौरंग गोदावरी एंटरटेनमेंट' या कंपनीविरुद्ध दिवाणी खटला दाखल केला होता. राजपालने 2010 मध्ये हे कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने 2018 मध्ये राजपालला 3 महिन्यांसाठी तुरुंगात जावे लागले होते.

Web Title: Rajpal Yadav had to make a movie, the bank sealed the property worth crores, kept the cooler running

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.