भन्साळींच्या समर्थनार्थ ‘सुशांत’ने हटवले ‘राजपूत’ आडनाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2017 11:18 AM2017-01-29T11:18:23+5:302017-01-29T17:00:44+5:30

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना जयपूरमध्ये झालेल्या मारहाणीनंतर संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे झाले आहे. ‘पद्मावती’ या चित्रपटात ...

'Rajput' surname deleted by Sushant in support of Bhansali | भन्साळींच्या समर्थनार्थ ‘सुशांत’ने हटवले ‘राजपूत’ आडनाव!

भन्साळींच्या समर्थनार्थ ‘सुशांत’ने हटवले ‘राजपूत’ आडनाव!

googlenewsNext
ग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना जयपूरमध्ये झालेल्या मारहाणीनंतर संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे झाले आहे. ‘पद्मावती’ या चित्रपटात  राणी पद्मावती यांचे अपमानास्पद चित्रण दाखवण्यात येत असल्याचा आक्षेप घेत ‘करणी सेना’ या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जयपूर येथील सेटवर तोडफड करत भन्साळी यांना मारहाण केली. या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने  या भ्याड हल्ल्याचा केवळ निषेधच केला नाही तर याविरोधात एक बोल्ड स्टेप घेतली. त्याने घेतलेली बोल्ड स्टेप ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. भन्साळींच्या समर्थनार्थ सुशांतने चक्क आपल्या twitter अकाऊंटवरील नावासमोरचे राजपूत हे आडनाव काढून टाकले. यासंदर्भात त्याने एक tweetही केले. ‘आडनावाचा मोह आपल्याला सुटणार नसेल तर  सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. हिम्मत असेल तर आपल्या पहिल्या नावाने स्वत:ची ओळख बनवा,’असे  tweet त्याने केले.
 


‘मानवता आणि प्रेम यापेक्षा ना कुठली जात मोठी आहे, ना कुठला धर्म. दयाभाव हा एकमेव गुण तुम्हाला माणूस बनवतो.  फूट कुठलीही असो. ती केवळ स्वार्थासाठीच असते,’असेही सुशांतने लिहिले.


आणखी एका  tweetमध्ये त्याने लिहिले, ‘स्वत:ची जागा बनवण्यासाठी काही लोक इतिहासाची ग्वाही देतात. मात्र यामुळे त्यांचे नाव कायमचे विस्मरणात जाईल, हे त्यांना ठाऊक नसते.’ सुशांतच्या या  tweetनंतर एकाने त्याला डिवचत, राजपूत हे आडनाव काढले तर मग सुशांत हे हिंदू नाव का? तेही बदल, अशा शब्दांत डिवचले. सुशांतने या डिवचणा-यालाही त्याच्याच शब्दांत उत्तर दिले.
 


ALSO READ : PADMAVATI ASSAULT: संजय लीला भंसाळीच्या पाठीशी उभे राहिले बॉलीवूड
​‘पद्मावती’मध्ये चुकीचे संदर्भ : सेटवर करणी सेनेने घातला धिंगाणा

काही दिवसांपूर्वी सुशांतने आपल्या आईच्या आठवणीत एक भावूक नोट लिहिली होती. २००२ मध्ये सुशांतच्या आईचे निधन झाले होते. तूर्तास सुशांत ‘चंदा मामा दूर के’ या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. लवकरच त्याला ‘राबता’ हा सिनेमा रिलीज होणार आहे.
 
 
 

Web Title: 'Rajput' surname deleted by Sushant in support of Bhansali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.