सिनेमासाठी राजकुमार रावने खरेदी केली शिलाई मशिन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 10:58 AM2018-07-26T10:58:35+5:302018-07-26T11:06:32+5:30

राजकुमार राव सध्या आपला आगामी सिनेमा 'स्त्री'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात तो एका टेलरची भूमिका साकारणार आहे.  

Raju Rao bought the film for Shilai Machine | सिनेमासाठी राजकुमार रावने खरेदी केली शिलाई मशिन

सिनेमासाठी राजकुमार रावने खरेदी केली शिलाई मशिन

googlenewsNext
ठळक मुद्देस्त्री हा एक हॉरर-कॉमेडी सिनेमा आहेपहिल्यांदाच श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत

राजकुमार राव सध्या आपला आगामी सिनेमा 'स्त्री'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात तो एका टेलरची भूमिका साकारणार आहे.  राजकुमार सांगतो टेलरचे काम सोप वाटत असेल तर ती सोपे नाहीय. एका तुम्ही खुर्चीवर बसलात की तुम्हाला तुमचा तोल संभाळावा लागतो. यासाठी त्याने शिलाई मशीन खरेदी केली. मुंबईतला एक टेलर त्याला शिलाई मशीनचे प्रशिक्षण देतोय. तसेच सेटवरदेखील त्याला एक टेलर गाईड करतो.  


राजकुमारला या सिनेमासाठी मध्यप्रदेशची भाषा शिकायची आहे. राजकुमार सांगतो, 'स्त्री'साठी त्यांने दुसऱ्या प्रोजेक्टमधून थोड्या दिवसांसाठी सुट्टी घेतली होती. राजकुमारने श्रद्धा कपूरचीदेखील स्तुती केली आहे. श्रद्धा कपूरने यासिनेमासाठी ऐवढी मेहनत केली आहे की बघणारे दंग होऊन जाते. ती खूपच गोड मुलगी आहे आणि आमच्या खूप चांगली मैत्री झाली आहे. 


स्त्री हा एक हॉरर-कॉमेडी सिनेमा आहे. श्रद्धा यात भूताच्या भूमिकेत दिसले तर राजकुमार राव पीडिताच्या असे अंदाज टीझर बघून लावण्यात येतोय. सिनेमाचे  दिग्दर्शन अमर कौशिक करणार आहेत तर सिनेमाचे लेखन राज आणि डिकेने केले आहे. सिनेमाची निर्मिती डिनेश विजन, राज आणि डीके करणार आहेत. राज आणि डिके यांनी शोर इन द सिटी, गो गोआ गॉन आणि हॅप्पी एंडिंग सारख्या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. पहिल्यांदाच राजकुमार श्रद्धासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 31 ऑगस्टला श्रद्धा आणि राजकुमार राव प्रेक्षकांना घाबरवायला आणि हसावायला येणार आहेत.  


राजकुमार रावचे शेड्यूल सध्या खूप जास्त बिझी आहे 'स्त्री' शिवाय कंगना राणौतसोबत 'मेंटल है क्या' आणि ऐश्वर्या राय बच्चनसोबत 'फन्ने खां'मध्ये दिसणार आहे.   
 

Web Title: Raju Rao bought the film for Shilai Machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.