'द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'नंतर 'मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर' प्रेक्षकांच्या भेटीला येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 07:10 PM2019-01-25T19:10:40+5:302019-01-25T19:21:12+5:30
राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन केले तर त्यांची पत्नी भारती मेहरा यांनी सिनेमाची निर्मिती केलीय.
राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन केले तर त्यांची पत्नी भारती मेहरा यांनी सिनेमाची निर्मिती केलीय. सार्वजनिक शौचालयांच्या कमतरतेवर या सिनेमातून भाष्य करण्यात आले आहे.
या सिनेमाचे शूटिंग मेहरा यांनी मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन या सिनेमाचे शूटिंग केले आहे. शूटिंगच्या आधी त्यांनी जवळपास एक महिना जागांची रेकी केली. सिनेमातून आई-मुलांच्या संबंधाना अधोरेखित करण्यात आले आहे. या सिनेमात राष्ट्री पुरस्कार विजेती अभिनेत्री अंजली पाटील देखील दिसणार आहे. जिने यात आईची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचे संगीत शंकर-एहसान-लॉय यांच्या जोडीने दिले आहे आणि सिनेमातील गाणी गुलजार यांनी लिहिली आहेत.
या सिनेमाने रोम फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या सिनेमाताला समीक्षकांकडून चार स्टार आणि स्टॅडिंग ऑवेशन मिळाले. यावेळी राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि सिनेमाच्या निर्मात्या भारती मेहरासुद्धा उपस्थित होत्या. राकेश ओमप्रकाश मेहरांनी या मेरे प्यारे प्राईम मिनिस्टरमधून देशातली खूप मोठी समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा सिनेमा 15 मार्च 2019ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा तयार करताना मेहरा यांनी अनेक झोपडपट्ट्यांमध्ये शौचालयेदेखील बांधून दिलीत. मेहरा यांनी आतापर्यंत "रंग दे बसंती" आणि "भाग मिल्खा भाग" सारखे दमदार सिनेमा बॉलिवूडला दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या आगामी 'मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर' सिनेमाच्या रिलीजची वाट त्यांचे फॅन्स नक्कीच पाहात असतील.