राकेश रोशन टक्कल का ठेवतात? 'K' या अक्षराशीही त्यांच खास कनेक्शन; जाणून रंजक किस्से

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 12:51 PM2023-09-06T12:51:06+5:302023-09-06T12:55:22+5:30

राकेश रोशन यांचा आज ७४ वाढदिवस आहे.

Rakesh Roshan Birthday 2023 Know Why He Is Always In Bald Look | राकेश रोशन टक्कल का ठेवतात? 'K' या अक्षराशीही त्यांच खास कनेक्शन; जाणून रंजक किस्से

Rakesh Roshan

googlenewsNext

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता, लेखक आणि संगीतकार राकेश रोशन यांचा आज 74 वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त बॉलिवूड स्टार्सनी आणि चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.  आज वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.


राकेश रोशन यांचा जन्म 6 सप्टेंबर 1949 रोजी मुंबईत झाला. सुरुवातीला आपल्या अभिनयाने तर नंतर दिग्दर्शनाच्या कलेने त्यांनी चाहत्यांना आपलंस केलं. आपल्या कामातून राकेश रोशन यांनी मोठ्या पडद्यावर आपली खास छाप सोडली आहे.  अनुभव सिन्हा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. 

राकेश रोशन यांनी अभिनेता म्हणून 1970 मध्ये आलेल्या 'घर घर की कहानी' या चित्रपटातून पदार्पण केले. 'सीमा', 'मन मंदिर', 'आँखों आँखों में', 'बुनियाद', 'झूठा कहीं का', 'खूबसूरत', 'खट्टा मीठा' अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली. तर दिग्दर्शक म्हणून 1987 मध्ये आलेला त्याचा पहिला चित्रपट होता 'खुदगर्ज'. ज्यामध्ये अभिनेता शत्रुघ्न सिन्हा आणि जितेंद्र मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर राकेश रोशन यांनी बॉलिवूडमध्ये 'कोई मिल गया', 'करण-अर्जुन', 'क्रिश' सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. 

राकेश रोशन डोक्यावर केस का नाहीत, हे जाणून घ्यायची लोकांना नेहमीच इच्छा असते. राकेश अचानक टक्कल का ठेऊ लागले, याचे कुतूहल चाहत्यांच्या मनात आहे. राकेश यांनी 1987 मध्ये 'खुदगर्ज' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तिरुपतीच्या मंदिरात नवस केला होता की, चित्रपट हिट झाल्यास मुंडन करेन. ‘खुदगर्ज’ हिट झाल्यानंतर राकेश आपला नवस विसरले. मात्र, त्यांची पत्नी पिंकी यांनी त्यांना नवसाची आठवण करून दिली. त्यानंतर त्यांनी केसांचा त्याग केला.  

राकेश रोशनचे बहुतेक चित्रपट सुरुवातीच्या काळात फ्लॉप ठरले होते. तेव्हा चाहत्याने त्यांना पत्र पाठवून सांगितले की, तुमच्या सर्व चित्रपटांच्या नावांची सुरुवात 'के' पासून करा. यानंतर राकेश रोशन त्यांनी 1987 मध्ये आलेला 'खुदगर्ज' या सुपरहिट चित्रपटाचे नाव 'के'वरून ठेवले आणि हा चित्रपट हिट ठरला. त्यानंतर राकेश रोशनने 'के' हे अक्षर लकी चार्म म्हणून स्वीकारले.  राकेश रोशन यांचे 'के'पासून सुरू होणारी जवळपास 50 चित्रपट आहेत. मुलगा हृतिक रोशन याला लाँच केले, तेव्हा त्याच्या चित्रपटाचे नावही ‘के’ वरून अर्थात ‘कहो ना प्यार है’ ठेवले. त्याचा हा चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरला. त्यानंतर त्यांनी हृतिकसाठी 'कोई मिल गया', 'क्रिश' सारखे सुपरहिट चित्रपट केले.

Web Title: Rakesh Roshan Birthday 2023 Know Why He Is Always In Bald Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.