राकेश रोशन का करतात टक्कल? कोणती घेतली होती शपथ? एकदाही वाढवले नाहीत केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:14 IST2025-03-19T14:14:05+5:302025-03-19T14:14:39+5:30

आजतागायत राकेश यांच्या डोक्यावर केस उगवले नाहीयेत.

Rakesh Roshan Discloses Why He Shaved His Head Reveals Vow | राकेश रोशन का करतात टक्कल? कोणती घेतली होती शपथ? एकदाही वाढवले नाहीत केस

राकेश रोशन का करतात टक्कल? कोणती घेतली होती शपथ? एकदाही वाढवले नाहीत केस

राकेश रोशन  (Rakesh Roshan)हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक आहेत. त्यांनी आतापर्यंत बॉलिवूडला अनेक हीट चित्रपट दिले आहेत. पण, एका गोष्टीसाठी ते कायम चर्चेत असतात. ती गोष्ट म्हणजे  राकेश रोशन यांचं टक्कल. राकेश रोशन यांना टक्कल का पडलं हा प्रश्न अनेकांना कायम पडतो. पण त्याचं कारणही तसंच आहे. हे टक्कल त्यांचं वैशिष्ट्य आहे. कायम टक्कल ठेवण्यामागे एक विशेष कारणदेखील आहे. दिग्दर्शक राकेश रोशन यांनी एक अनोखी शपथ घेतली होती. काय घडलं होतं नेमकं? चला तर मग जाणून घेऊया.

राकेश रोशन यांचे आजही खूप चाहते आहेत. राकेश यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांना सफलता मिळाली पण अभिनयाच्या बाबतीत ते कायमच मागे राहिले.  राकेश यांनी ज्या सिनेमात मुख्य भुमिका साकारल्या, ते चित्रपट हीट झाले नाही. मग त्यांनी अभिनय सोडला आणि दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरूवात केली. राकेश रोशन यांनी १९८७ मध्ये 'खुदगर्ज' या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं.  'सिनेमा जर हीट झाला तर केस दान करेन' अशी शपथ राकेश यांनी तिरुपती येथे घेतली होती. अखेर 'खुदगर्ज'  सिनेमा सुपरहिट ठरल्यानंतर राकेश यांनी मुंडन केलं होतं. तेव्हा जे मुंडन केलं, ते आजतागायत त्यांनी डोक्यावर केस उगवले नाहीयेत. 

अलिकडेच एएनआयला दिलेल्या मुलाखतीत राकेश रोशन म्हणाले, 'मी मुंडण करण्याची आणि ते असेच ठेवण्याची प्रतिज्ञा केली होती. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून खुदगर्ज ही माझी शेवटची संधी होती. जर तो चित्रपट चांगला चालला नसता, तर मी इथे बसलो नसतो. म्हणून मी शपथ घेतली की जर तो चित्रपट हिट झाला, तर मी मुंडन करेन आणि चित्रपट हिट झाला. पण, मुंडन करण्यासाठी माझ मन तयार होत नव्हतं. पण, वचन पुर्ण न केल्यानं मला झोप येत नव्हती. एकेदिवशी मी न्हावीला माझ्या घरी बोलावलं आणि तो माझ्यासोबत एक तास बसला. माझ ठरत नव्हतं. शेवठी मी निर्णय घेतला आणि वचनपुर्ती करत मुंडन केलं". 

दरम्यान, बॉलिवूड इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत जे खूप श्रद्धाळू आहेत. एखाद्या गोष्टीवर विश्वास असल्यामुळे ते एका विशिष्ट तारखेला चित्रपट प्रदर्शित करतात तर कधी नावात किंवा आडनावात बदल करतात. सध्या राकेश रोशन हे 'क्रिश ४' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अलिकडेच त्यांनी आपण 'क्रिश ४' दिग्दर्शित करणार नसल्याची घोषणा केली. दरम्यान, अलिकडेच द रोशन्स' (The Roshans) ही बहुप्रतिक्षित डॉक्यु-सिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. शशी रंजन दिग्दर्शित ही डॉक्यु-सिरीजमध्ये राकेश रोशनच्या यांच्या कुटुबांतील प्रत्येकाच्या आयुष्यातला संघर्ष, आव्हानं, यश दाखवलं आहे. 

Web Title: Rakesh Roshan Discloses Why He Shaved His Head Reveals Vow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.