कॅन्सर सर्जरीनंतर कुटुंबासोबत दिसले राकेश रोशन! पाहा, फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 10:13 AM2019-01-11T10:13:15+5:302019-01-11T10:15:01+5:30
राकेश रोशन यांच्या चाहत्यांसाठी खास खबर आहे. होय, थ्रोट कॅन्सरने पीडित राकेश रोशन यांची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे. खुद्द राकेश रोशन यांनी सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली.
ठळक मुद्दे गत ७ जानेवारीला हृतिकने स्वत: सोशल मीडियावर आपल्या वडिलांना कॅन्सरचे निदान झाल्याचे सांगितले होते. त्याच दिवशी राकेश रोशन यांच्यावर पहिली शस्त्रक्रिया झाली. हृतिक रोशनच्या या पोस्टनंतर राकेश रोशन यांचे तमाम चाहते त्यांच्या लवकर बरे होण्याची कामना करत आहे
राकेश रोशन यांच्या चाहत्यांसाठी खास खबर आहे. होय, थ्रोट कॅन्सरने पीडित राकेश रोशन यांची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे. खुद्द राकेश रोशन यांनी सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली.
शस्त्रक्रियेनंतर मी एकदम ठीक आहे आणि लवकरच घरी जाईल,असे राकेश रोशन यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले. सर्जरीनंतरचा त्यांचा पहिला फोटोही सोशल मीडियावर शेअर केला गेला. या फोटोत राकेश रोशन आपल्या कुटुंबासोबत दिसत आहेत. फोटोत राकेश रोशन यांच्या नाकात नळी लागलेली दिसतेय.
काल हृतिक रोशन याचा वाढदिवस होता. हृतिकने आपला वाढदिवस पापा राकेश रोशन यांच्यासोबत रूग्णालयात साजरा केला. या सेलिब्रेशनचा एक फोटोही हृतिकने शेअर केला.
‘ते उठून उभे झालेत. ही प्रेमाची शक्ती आहे. आजचा दिवस खूप चांगला होता,’असे हा फोटो शेअर करताना हृतिकने लिहिले आहे.प्राप्त माहितीनुसार, अद्याप राकेश रोशन यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला नाही.
गत ७ जानेवारीला हृतिकने स्वत: सोशल मीडियावर आपल्या वडिलांना कॅन्सरचे निदान झाल्याचे सांगितले होते. त्याच दिवशी राकेश रोशन यांच्यावर पहिली शस्त्रक्रिया झाली. हृतिक रोशनच्या या पोस्टनंतर राकेश रोशन यांचे तमाम चाहते त्यांच्या लवकर बरे होण्याची कामना करत आहेत. अनेक युजर्सनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे.
१९७० मध्ये घर घर की कहानी या सिनेमाद्वारे त्यांनी आपल्या अॅक्टिंग करिअरचा श्रीगणेशा केला. खून भरी मांग, खेल खेल में, खट्टा मीठा, खुबसूरत यांसह जवळपास ४० सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला. त्यानंतर खुदगर्ज या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात एन्ट्री घेतली. काला बाजार, किशन कन्हैया , करण अर्जुन , कहो ना प्यार है, कोई मिल गया , क्रिश या सिनेमांचे यशस्वी दिग्दर्शन केले. मुलगा हृतिकला त्यांनी कहो ना प्यार है या सिनेमाद्वारे फिल्म इंडस्ट्रीत लाँच केले. या सिनेमाने हृतिकला एका रात्रीत सुपरस्टार बनवले.