दीर्घकाळानंतर मोठ्या पडद्यावर परतणार राखी गुलजार!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 05:54 AM2018-04-13T05:54:46+5:302018-04-13T11:24:46+5:30
एकेकाळची गाजलेली अभिनेत्री राखी गुलजार सुमारे दीड दशकांपासून मोठ्या पडद्यावरून दिसलेली नाही. पण आता ही अभिनेत्री पुन्हा परतणार आहे. ...
ए ेकाळची गाजलेली अभिनेत्री राखी गुलजार सुमारे दीड दशकांपासून मोठ्या पडद्यावरून दिसलेली नाही. पण आता ही अभिनेत्री पुन्हा परतणार आहे. होय, उण्यापु-या १५ वर्षांनंतर राखी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करते आहे. होय, गौतम हलदर दिग्दर्शित एका बांगला चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये राखी दिसणार आहे. राखीला गत काळात अनेक आॅफर्स आल्यात. पण तिने या सगळ्या आॅर्फर नाकारल्या. पण गौतम हलदर हे मोती नंदी यांच्या ‘बीजोलीबालार मुक्ती’या गाजलेल्या कादंबरीवर आधारित चित्रपट बनवत आहेत, हे तिला कळले आणि तिने ही आॅफर स्वीकारली. हा चित्रपट ओरिजनली बांगला भाषेत साकारला जातो आहे. पण मेकर्सने हिंदीतही हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आणि राखीने या चित्रपटासाठी होकार दिला. तूर्तास राखीने बांगला चित्रपटाचे शूट पूर्ण केले आहे आणि आता हिंदी डबिंग ती स्वत: करणार आहे. हा चित्रपट एका ७० वर्षांच्या ब्राह्मण विधवेची कथा आहे. जी आपल्या अधिकारासाठी लढते.
२००३ मध्ये रितुपर्णो घोष दिग्दर्शित ‘शुभो मुहूर्त’ या चित्रपटात राखी दिसली होती. याचवर्षी आलेल्या ‘दिल का रिश्ता’ या चित्रपटातही राखीने भूमिका साकारली होती. यात तिने ऐश्वर्या राय बच्चनच्या आईची भूमिका साकारली होती. यानंतर राखी कुठल्याच चित्रपटात दिसली नाही.
ALSO READ : इतकी बदलली ‘करण-अर्जुन’ची ‘आई’! ओळखणेही झाले कठीण!!
सत्तरीच्या दशकात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणा-या राखीचे लग्न अजय बिस्वास या निर्मात्यासोबत झाले होते. अजय यांच्यामुळेच ती अभिनयक्षेत्रात आली. पण लग्नाच्या काहीच वर्षांनंतर त्यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर दिग्दर्शक, गीतकार व कवी गुलजार तिच्या आयुष्यात आले आणि त्यांच्यासोबत तिने लग्न केले. पण राखीने चित्रपटात काम करू नये असे गुलजार यांचे म्हणणे होते. त्यामुळे गुलजार यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर राखीने चित्रपटांत काम करणे बंद केले. राखीला लग्नानंतरही अनेक चित्रपटांच्या आॅफर्स येत राहिल्या. पण चित्रपटात काम करण्याचा विषय काढताच गुलजार तिच्यावर चिडत असत आणि त्यामुळे तिने चित्रपटसृष्टीपासून दूर राहाण्याचेच ठरवले.