Rakhi Sawant : "आदिलच्या डोक्यावर केस नाहीत, तो बायसेक्शुअल, त्याचा न्यूड Video…"; राखीने केली पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 12:57 PM2023-02-25T12:57:48+5:302023-02-25T13:08:26+5:30
Rakhi Sawant And Adil Khan : राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांच्यातील खटके दिवसेंदिवस वाढत आहेत.
राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांच्यातील खटके दिवसेंदिवस वाढत आहेत. आदिलच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आणि पोलिसांत तक्रार देण्यासाठी राखी शर्लिन चोप्रासोबत म्हैसूरला पोहोचली होती. आता म्हैसूरला पोहोचल्यानंतर राखी सावंतने आदिलची एक्स गर्लफ्रेंड रोशिनाची देखील भेट घेतली. याच दरम्यान राखीने सांगितले की, तिला आदिलचं सत्य कळलं की, "तो व्यवसायाने ड्रायव्हर आहे. बायसेक्शुअल आहे, डोक्यावर केस नाहीत. झोपडपट्टीत राहतो". राखीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हे सर्व सांगितले आहे.
"आदिल खानच्या डोक्यावर केस नाहीत, हे मला माहीत नव्हतं. त्याला टक्कल आहे, याची माहिती मला हेअर अँड स्कीन फॅक्टरीने दिली आहे. हे ऐकून मला धक्का बसला आहे. तो बायसेक्शुअल आहे, हेही मला समजलं आहे. त्याचा एक न्यूड व्हिडीओही काहीच दिवसांपूर्वी मी पाहिला. खूप घाणेरडा व्हिडीओ होता" असं राखीने म्हटलं आहे. आदिल पोलिसांच्या ताब्यात आहे. ड्रामा क्वीनचा नवरा तुरुंगात आहे. याच दरम्यान, आता राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ड्रामा क्वीन नववधू दिसत आहे.
Video - नवरी नटली! राखी सावंत तिसऱ्यांदा लग्न करणार?; ब्राइडल लूक व्हायरल
राखी सावंतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ड्रामा क्वीनला नववधूच्या वेषात पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत. राखी पुन्हा लग्न करणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. राखी पुन्हा शूट मोडमध्ये आली आहे आणि नुकतेच तिने वधूच्या रूपात शूट केले आहे. राखीने पुन्हा लग्न करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, ती केवळ शूटिंगसाठी वधू बनली आहे. व्हिडिओमध्ये राखी सावंत म्हणताना दिसत आहे, "मी एकदाच लग्न केले आहे, पुन्हा कधीच नाही. मला आयुष्यात पुन्हा लग्नाचा पोशाख घालायचा नाही." आदिलबद्दल बोलताना ती म्हणाली, "माझा एकच नवरा आहे, तो तुरुंगात आहे."
"माझं घर तोडलं, मी रस्त्यावर आली", राखी सावंतचा नवा 'ड्रामा'
आदिलने घर तोडल्याचं राखीचे म्हणणं आहे. अभिनेत्री म्हणाली, "माझे घर तुटलं. राखी सावंतला रस्त्यावर आणलं." ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल रोज खुलासे करत आहे. तिचा पती आदिल खान दुर्रानी सध्या तुरुंगात आहे. राखी स्वतःला न्याय देण्याची मागणी करत आहे. जेव्हा राखीला विचारण्यात आले की ती आदिलबद्दल इतकी डेस्पेरेट का आहे? यावर रडत रडत राखी म्हणते, "मी डेस्पेरेट नाही. मी विचार करतेय की तो माझ्यासारख्या कणखर मुलीला कसा फसवू शकतो. माझे आयुष्य का उद्ध्वस्त केले."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"