Rakhi Sawant : राखी सावंत आता कधीच होऊ शकत नाही आई! म्हणाली - "आतून खूप वेदना आहेत पण..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 01:38 PM2024-07-08T13:38:47+5:302024-07-08T13:40:02+5:30
Rakhi Sawant : राखी सावंत सध्या दुबईत आहे. राखीवर नुकतीच सर्जरी करण्यात आली आहे. राखीच्या पोटातून १० सेमीचा ट्यूमर काढण्यात आला आहे.
बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या दुबईमध्ये आहे. राखी पापाराझींच्या कॅमेऱ्यांपासून दूर असली तरी मुंबईत होणाऱ्या प्रत्येक कृतीवर तिची नजर असते. अलिकडेच राखीने पोटातून १० सेमीचा ट्यूमर काढण्यात आला आहे. तिच्या आरोग्याविषयी आणि आयुष्याबद्दल तिने अपडेट दिलीय आणि कठीण काळात तिला कोणी साथ दिली हेही सांगितले. एवढेच नाही तर राखीने यूट्यूबर अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिक हिच्यावरही निशाणा साधला. यावेळी राखीने आता ती कधीच आई होऊ शकत नसल्याची खंत व्यक्ती केली.
राखी सावंत ही सलमान खानची खूप मोठी फॅन आहे. सलमान तिला किती सपोर्ट करतो हे अभिनेत्री सांगते. तिने टेली टॉक इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिचे मेडिकल बिल सलमान खानने भरले. कठीण प्रसंगातून गेलेली राखी सावंत शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच बोलली आहे. या काळात तिला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला हेही तिने सांगितले आहे.
सलमान खानने केली मदत
राखी म्हणाली की, डॉक्टरांना सुरुवातीला वाटले की मला हृदयविकाराचा झटका आला आहे, पण नंतर तपासणीनंतर त्यांना माझ्या पोटात १० सेमीची गाठ आढळली. मला नेहमी प्रश्न पडतो की मला एवढी अॅसिडिटी का आहे? उपचाराचा एक भाग म्हणून त्यांनी माझे गर्भाशय आणि गाठ काढून टाकली. मी आयसीयूमध्ये कोमात होते. सलमान खानने राखीचे बिल भरले, असे राखीने सांगितले. ती म्हणाली की, या कठीण काळात सलमान खानने तिला खूप साथ दिली. तो एकही शब्द न बोलता पुढे आला आणि तिला तिची मोठी वैद्यकीय बिले भरण्यास मदत केली. तो आपल्या लोकांना कधीच विसरत नाही. कोणालाही न सांगता मदत करतो. त्याने माझ्या वैद्यकीय बिलांमध्येही मदत केली आहे. माझा एक्स पती रितेशही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. आम्ही विभक्त होऊनही त्याने मला साथ दिली.
आई होऊ शकत नाही राखी
आता ती कधीच आई होऊ शकणार नाही, अशी खंतही राखीने व्यक्त केली. राखी म्हणाली की, आतून खूप वेदना होत आहेत पण आयुष्याला सामोरे जावे लागेल. मी आता सरोगसीबद्दल विचार करेन. कारण मी मूल दत्तक घेऊ शकत नाही. मी विकी डोनर सारखे काहीतरी योजना किंवा विचार करीन, मला वारस हवा आहे.
राखीने आदिलवर व्यक्त केला संताप
यासोबतच राखीने एक्स पती आदिल खान दुर्रानीवरील संताप व्यक्त केला. राखी म्हणाली की, तिने माझा फोन हॅक केला, तिचे न्यूड व्हिडिओ लीक केले आणि नंतर माझ्यावर केस दाखल केली. आता तो माझ्यावर आरोप करत आहे. मी निर्दोष आहे. त्याने मला उद्ध्वस्त केले आहे. माझे सर्व पैसे घेतले. त्याने माझी बदनामी केली आहे. राखीने सांगितले की तिची बेस्ट फ्रेंड राजश्री देखील तिच्या विरोधात गेली आहे. तिला बिग बॉस ओटीटी ३ ची ऑफर मिळाली होती, परंतु कायदेशीर प्रक्रियेमुळे ती सहभागी होऊ शकेल की नाही हे माहित नाही.
पायलवर संतापली अभिनेत्री
यासोबतच राखीने अरमान मलिकची पहिली पत्नी पायल हिच्यावरही राग व्यक्त केला. ती म्हणाली की, या जगात चांगुलपणा नाही. मला तिच्याबद्दल वाईट वाटत होते कारण तिच्या जिवलग मैत्रिणीने तिच्याच नवऱ्याशी लग्न केले होते. म्हणूनच मी तो व्हिडिओ पोस्ट केला होता. पण पायलने तिच्या प्रसिद्धीसाठी माझे नाव वापरण्यास सुरुवात केली. भारताचे नाव बदनाम करणाऱ्या अशा महिलांची लाज वाटते. ती लोकांना काय संदेश देत आहे?