Rakhi Sawant : Video - झूठा! प्रपोज, अफेअर, निकाह अन् आईचा मृत्यू; राखीने गाण्यातून केला आदिलचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 19:11 IST2023-03-11T19:02:35+5:302023-03-11T19:11:10+5:30
Rakhi Sawant : राखी सावंतचे नवीन गाणे 'झूठा' रिलीज झाले आहे. हे गाणे तिच्या खऱ्या आयुष्यातून प्रेरित आहे.

Rakhi Sawant : Video - झूठा! प्रपोज, अफेअर, निकाह अन् आईचा मृत्यू; राखीने गाण्यातून केला आदिलचा पर्दाफाश
राखी सावंतचे नवीन गाणे 'झूठा' रिलीज झाले आहे. हे गाणे तिच्या खऱ्या आयुष्यातून प्रेरित आहे. आदिल तुरुंगात गेल्यानंतर राखीने हे गाणे शूट केले. त्यावेळी ती सेटवर अनेकदा पापाराझींसोबत बोलताना दिसली आणि तिच्या या गाण्याबद्दलही चर्चा झाली. शुक्रवारी राखीचे गाणे रिलीज झाले, यावेळी तिने मीडियासमोर आपली व्यथा मांडली. राखी तिचे म्हणणे मांडत असतानाच अचानक स्टेजवर जोरजोरात रडू लागली. मी माणूस नाही का? असंही राखी म्हणते.
रिलीज झालेल्या राखीच्या म्युझिक व्हिडिओमध्ये एका चाहत्याने तिला कार गिफ्ट करून लग्नाचा प्रस्ताव दिल्याचे दाखवण्यात आले आहे. तो चाहता म्हणजे आदिल खान आहे. तिचा निकाह देखील होतो. काही काळानंतर राखीच्य़ा आईचा मृत्यू होतो. दुसरीकडे राखीची मोठी फसवणूक होते हेही दाखवण्य़ात आलं आहे. गाण्याच्या लॉन्चिंगच्या वेळी राखी स्वत:ला सावरू शकली नाही. युजर्सनी तिला या परिस्थितीवरून ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
लोकांच्या कमेंट्समुळे रडू लागली राखी
राखी मीडियासमोर म्हणाली, 'लोक म्हणतात, राखी सावंतला कोण फसवू शकतं?. राखी सावंतचे काय वाईट होऊ शकतं?. मी माणूस नाही का?, मी स्त्री नाही का?, मला हृदय नाही का?, मी स्थिरावण्याचे स्वप्न पाहू शकत नाही का?” हे सांगताच राखी ओरडली आणि ती रडत रडत खाली बसली.
विरल भयानी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यावर एका युजरने कमेंट केली, 'बस कर राखी, इतकी ओव्हर एक्टींग करायची गरज नाही. कधीकधी सामान्य माणसांसारख वाग. हे आरोग्यासाठी चांगले आहे. एका युजरने कमेंट केली, कदाचित हे बरोबर असेल पण हे सर्व सार्वजनिकपणे करणे योग्य वाटत नाही. एकाने म्हटले, सर्वजण संभ्रमात आहेत की हे सेटवर घडत आहे की खरं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.