मोदीजी आप सुन रहे है? राखी सावंतने मोदींकडे केली ‘स्पेशल डिमांड’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 12:22 PM2019-11-28T12:22:21+5:302019-11-28T12:22:51+5:30

बॉलिवूडची ड्रामा क्विन कधी काय करेल, याचा नेम नाही. आम्ही कुणाबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच.

Rakhi Sawant Demands A Unique Birthday Gift From PM Narendra Modi | मोदीजी आप सुन रहे है? राखी सावंतने मोदींकडे केली ‘स्पेशल डिमांड’

मोदीजी आप सुन रहे है? राखी सावंतने मोदींकडे केली ‘स्पेशल डिमांड’

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या अनेक दिवसांपासून राखी चर्चेत आहे. विशेषत: तिच्या लग्नामुळे.

बॉलिवूडची ड्रामा क्विन कधी काय करेल, याचा नेम नाही. आम्ही कुणाबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. होय, राखी सावंत हिच्याबद्दल. रोज नवे चित्रविचित्र व्हिडीओ टाकून चर्चेत राहण्याचा खटाटोप कुणी राखीकडून शिकावा. आता या बयेने काय केले तर स्पेशल डिमांड. ती सुद्धा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे.  
  राखीने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या निमित्ताने तिने एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले. या पत्रकार परिषदेत राखीने मीडियाच्या माध्यमातून एक खास मागणी  पुढे रेटली. ती म्हणजे,पाकिस्तानची. होय, मोदीजी, मला बर्थ डे गिफ्ट म्हणून पाकिस्तान हवाय, असे ती म्हणाली.


‘ माझी फक्त एकच मागणी आहे ती पाकिस्तानची. पंतप्रधान मोदींनी काश्मीरवर विजय मिळवला. त्याचप्रमाणे त्यांनी पाकिस्तानवर विजय मिळवावा. मोदीजी रॉक्स,’ असे ती यावेळी म्हणाली. इतकेच नाही तर मोदींच्या नावाची नारेबाजीही केली. यावेळी तिने पंतप्रधान मोदींच्या नावाची नारेबाजी देखील केली. मोदीजी आप सुन रहे हैं ना? असे म्हणत तिने मोदींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.  तिची ही हाक मोदींपर्यंत पोहोचली की नाही, हे आम्हाला ठाऊक नाही. पण हो, सोशल मीडियावर राखीची ही ‘स्पेशल डिमांड’ चांगलीच व्हायरल झाली आहे.
याआधी अनेकदा राखीने पंतप्रधान मोदींबद्दल स्तुतीसुमने उधळली आहेत. एका इव्हेंटला तर ती थेट मोदींचा फोटो असलेला ड्रेस घालून पोहोचली होती.


गेल्या अनेक दिवसांपासून राखी चर्चेत आहे. विशेषत: तिच्या लग्नामुळे. एनआरआयशी लग्न केल्याचे सांगून राखीने सर्वांचे लक्ष वेधून गेले. अर्थात तिचा हा एनआरआय पती कोण, कुठला हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.
   

Web Title: Rakhi Sawant Demands A Unique Birthday Gift From PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.