चालत्या गाडीत राखी सावंत पडली; Video पाहून येईल हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 03:30 PM2021-10-14T15:30:00+5:302021-10-14T15:30:00+5:30

Rakhi Sawant: राखीचा असाच एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. यात राखी चालत्या गाडीत पडल्याचं दिसून येत आहे.

Rakhi Sawant fell in the moving car; You can watch the video and smile | चालत्या गाडीत राखी सावंत पडली; Video पाहून येईल हसू

चालत्या गाडीत राखी सावंत पडली; Video पाहून येईल हसू

googlenewsNext
ठळक मुद्देराखी तिच्या वायफळ बडबडीसोबतच तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठीही चर्चेत असते.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. राखी बऱ्याचवेळा तिच्या कामाऐवजी चित्रविचित्र वागण्यामुळे चर्चेत येत असते. यात प्रसार माध्यमांसमोर अनेकदा वायफळ बडबड केल्यामुळे ती प्रकाशझोतात येत असल्याचं पाहायला मिळतं. सध्या राखीचा असाच एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. यात राखी चालत्या गाडीत पडल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे छायाचित्रकारांमुळे ती गाडीत पडल्याचं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ bollywoodpap या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राखी तिच्या गाडीच्या सीटवर आडवी पडल्याचं दिसून येत आहे. यामध्येच प्रसार माध्यमांचे कॅमेरा पाहिल्यालर राखी स्वत:ला सावरत उठवते आणि तुमच्यामुळेच मी पडले असं म्हणते. 

'अरे भाई तुमने तो मुझे गिरा ही दिया? लवकर बोला काय झालं?', असं राखी म्हणते.यावेळी राखीला आर्यन खानविषयी प्रश्न विचारण्यात आले. मात्र, मोठ्या शिताफीने तिने या प्रश्नाचं उत्तर टाळलं. 'आजच सगळे प्रश्न विचारणार का? एक तर तुमच्या नादात मी पडले', असं राखी म्हणाली.

दरम्यान, यावेळी राखीने 'बिग बॉस १५' विषयीदेखील तिच मत व्यक्त केलं. 'बिग बॉस त्यांच्या जेवणात प्रेमाचा कोणता तरी मसाला घालत असतील', असं ती म्हणाली. राखी तिच्या वायफळ बडबडीसोबतच तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठीही चर्चेत असते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तिने काळ्या रंगाचा टी- शर्ट आणि जेगिंग्स परिधान केलं आहे. तर, डोक्यावर एक कॅप घातली आहे.
 

Web Title: Rakhi Sawant fell in the moving car; You can watch the video and smile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.