आमिर खानला कोरोना? OMG, मोदी जी...! राखी सावंतची ‘ओव्हरअ‍ॅक्टिंग’ पाहून युजर्सनी मारला डोक्यावर हात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 01:37 PM2021-03-25T13:37:17+5:302021-03-25T13:38:24+5:30

होय, आमिरला कोरोना झाल्याचे कळताच तिने अशी काही प्रतिक्रिया दिली की, युजर्सनी  ‘नौटंकी राखी’ म्हणत तिची मजा घेतली.

rakhi sawant gets trolled after gave her reaction on aamir khan testing positive-to-coronavirus | आमिर खानला कोरोना? OMG, मोदी जी...! राखी सावंतची ‘ओव्हरअ‍ॅक्टिंग’ पाहून युजर्सनी मारला डोक्यावर हात

आमिर खानला कोरोना? OMG, मोदी जी...! राखी सावंतची ‘ओव्हरअ‍ॅक्टिंग’ पाहून युजर्सनी मारला डोक्यावर हात

googlenewsNext
ठळक मुद्देबिग बॉस 14 मधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत सतत या ना त्या कारणाने चर्चेत आहे.  पापाराझींच्या कॅमे-यासमोर मस्ती करताना दिसतेय.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा कोरोना रिपोर्ट काल बुधवारी पॉझिटीव्ह आला. आमिरच्या टीमने खुद्द ही माहिती दिली. आमिरला कोरोना झाल्याचे कळताच चाहत्यांना धक्का बसला. पण सर्वाधिक धक्का कोणाला बसला असेल तर तो म्हणजे ड्रामा क्वीन राखी सावंतला. होय, आमिरला कोरोना झाल्याचे कळताच तिने अशी काही प्रतिक्रिया दिली की, युजर्सनी  ‘नौटंकी राखी’ म्हणत तिची मजा घेतली.
राखीचा हा व्हिडीओ आहे मुंबईतील. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. राखी दिसताच फोटोग्राफर्स तिला आमिरला कोरोना झाल्याची बातमी देतात. यावर ओह माय गॉड... खरंच, हे खूप भीतीदायक आहे. आमिरजी आय लव्ह यू, आय मिस यू..., असे राखी तिच्या नेहमीच्या अंदाजात म्हणते.

राखीचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि युजर्सनी तिला ट्रोल करणे सुरु केले. हे जरा अति झाले, असे एका युजरने लिहिले. अन्य एका युजरने ‘नौटंकी राखी’ अशी कमेंट केली. तर अन्य एकाने ‘तो जिवंत आहे आणि बराही होईल. पण या ओव्हर अ‍ॅक्टिंगसाठी तुझे 50 रूपये कापावे लागतील,’ अशा शब्दांत राखीला ट्रोल केले.

बिग बॉस 14 मधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत सतत या ना त्या कारणाने चर्चेत आहे.  पापाराझींच्या कॅमे-यासमोर मस्ती करताना दिसतेय. इतकेच नाही तर लोकांना बोलवून बोलवून सेल्फी देतेय. गेल्या काही दिवसांत तिचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.  
 बिग बॉस 14  मध्ये राखी सर्वात एंटरटेनिंग कंटेस्टंट होती. एक चॅलेंजर म्हणून तिने घरात एन्ट्री घेतली होती. बिग बॉसच्या फिनालेपर्यंत जाणारी ती एकमेव चॅलेंजर ठरली. टॉप 5 मध्ये जागा पक्की केल्यानंतर 14 लाख रुपए घेऊन राखीने शो सोडला होता.  आता शो संपला आहे आणि राखी आपल्या आईजवळ परतली आहे. राखीची आई कॅन्सरशी लढतेय. तिच्यावर उपचार सुरु आहेत. 

Web Title: rakhi sawant gets trolled after gave her reaction on aamir khan testing positive-to-coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.