लडकी नहीं देखी अंकल? एकटक बघणाऱ्या काकाची राखी सावंतने भररस्त्यावर घेतली ‘शाळा’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 04:06 PM2021-06-06T16:06:59+5:302021-06-06T16:07:46+5:30
सध्या राखीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल हातोय. होय, या व्हिडीओत काय तर राखी एका ‘अंकल’चा क्लास घेताना दिसतेय.
बॉलिवूडची ड्रामा क्वीन अर्थात राखी सावंत (Rakhi Sawant) लॉकडाऊन काळात या ना त्या कारणाने चर्चेत आहे. होय, मुंबईच्या रस्त्यावर राखी दिसली रे दिसली की, पापाराझी तिच्याभोवती गराडा घालतात. मग राखी काहीतरी बोलते आणि चर्चेत येते. सध्या तिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल हातोय. होय, या व्हिडीओत काय तर राखी एका ‘अंकल’चा क्लास घेताना दिसतेय.
होय, व्हिडीओत राखी पापाराझींसोबत अभिनेता पर्ल व्ही पुरीच्या अटकेवर प्रतिक्रिया देतेय. अशात एक व्यक्ति आपल्याकडे एकटक बघत असल्याचे राखीच्या लक्षात येते. आता यावर राखी बोलणार नाही, असे कसे होणार? ‘अंकल, आप जाओ ना, मैं इंटरव्ह्यू कर रही हूं. आप क्यों देख रहे हो? लडकी नहीं देखी अंकल?,’ असे ती त्या एकटक बघणा-या व्यक्तिला सुनावते.
त्यानंतर ते काका तिथून दुचाकी घेऊन निघतात. पण राखी त्यावरही कमेंट करते. जाओ ना, देखो उधर अॅक्सिडेंट हो जाएगा, असे ती म्हटले. इतकेच नाही तर वो मेरे को देख रहा है, मेरे कॉस्च्युम को देख रहा है. उधर से बस और गाडी आ रही है, असे ती म्हणते.
व्हिडीओत राखी काही चाहत्यांना सेल्फी देतानाही दिसते. voompla ने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
राखी सावंतची (Rakhi Sawant) आई जया सावंत गेल्या अनेक महिन्यांपासून कॅन्सरशी लढतेय. राखी ‘बिग बॉस 14’मध्ये असतानाच तिला आपल्या आईच्या आजाराबद्दल कळले होते. आईच्या उपचारासाठी राखीजवळ पैसे नव्हते. शोमधून कमावलेल्या पैशातून ती आईचा उपचार करू इच्छित होती. अशावेळी सलमान खान तिच्या मदतीला धावून आला. राखीच्या आईच्या उपचाराचा सर्व खर्च त्याने आपल्या खांद्यावर घेतला आणि काल राखीच्या आईवर यशस्वी शस्त्रक्रिया करत, तिच्या पोटातील कॅन्सरचा ट्युमर बाहेर काढण्यात आला