राखी सावंतची 'सटकली', कंगनाला भिकारी म्हणाली... पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 11:43 AM2020-09-12T11:43:17+5:302020-09-12T12:17:33+5:30
राखी सावंतने शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाख ६० हजारपेक्षा जास्त वेळ बघण्यात आलाय.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने जेव्हापासून मुंबईची तुलना पीओकेसोबत केली, तेव्हापासून अनेक लोक तिच्यावर नाराज आहेत अभिनेत्री राखी सावंतही त्या लोकांपैकी एक आहे. राखी सावंतने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत कंगना रनौतला चक्क भीकारी म्हटलंय. इतकेच नाही तर ती म्हणाली की, मुंबई जर पीओकेसारखी वाटते तर परत इथे का आली?
राखी सावंत म्हणाली की, कंगनाने तिच्या हिमाचलमधील घरीच रहायचं पाहिजे होतं. राखी सावंतने यात कंगनाबाबत अनेक गोष्टी केल्या आहेत. पण राखीचं कंगनाला अशाप्रकारे भीकारी म्हणणं कंगनाच्या फॅन्सना पसंत पडलेलं दिसत नाही. राखी सावंतने शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाख ६० हजारपेक्षा जास्त वेळ बघण्यात आलाय.
राखीने आधीही केली होती टीका
याआधीही राखी सावंतने कंगनावर निशाणा साधला होता. राखी सावंतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात ती म्हणाली होती की, कंगनासोबत जे काही होत आहे ते चांगलं होत आहे. राखी सावंतच्या या व्हिडीओत कमेंटबॉक्समध्ये कंगनाचे फॅन्स राखीवर टीका करत आहेत.
हा व्हिडीओ शेअर करत राखी सावंतने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मानवतेला सपोर्ट आणि कंगनाला उत्तर...आपण मनुष्य आहोत, याला जाती-धर्मात विभागू नकी. सूर्याची किरणे आणि चंद्राचा प्रकाश सर्वांवर सारखाच पडतो. आपण सगळे एक आहोत. कुणीही लहान-मोठं नाहीय. सगळे सारखे. आपलं संविधान बेस्ट आहे. ते खराब करण्याची हिंमत करू नका'.
शिवसेना- कंगना वाद शिगेला...
शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत ( Kangana Ranaut) यांच्यातील वाद आता शिगेला गेला आहे. मुंबई महापालिकेनं कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर ( Kangana Ranaut's office) कारवाई केली. या कारवाईचे फोटो ट्विट करत कंगनानं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून जोरदार टीका केली. मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनानं तिच्या ऑफिसमधील व्हिडीओ पोस्ट करून संताप व्यक्त केला.
हे पण वाचा :
VIDEO : कंगनावर राखी सावंतने केली टीका, लोक म्हणाले - तुझं डोकं ठिकाणावर नाही'
कंगनावर दुसरा वार करण्याची तयारी, आता मुंबई पोलीस करणार ड्रग्स केसची चौकशी