बोला था ना मैंने...! राखी सावंतने व्हिडीओ शेअर केला; हजारो लोकांनी पाहिला!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 03:47 PM2019-11-24T15:47:23+5:302019-11-24T15:48:05+5:30

देशातच नाही तर जगाच्या कानाकोप-यात कुठेही काहीही घडो, राखी त्यावर बोलणार म्हणजे बोलणार. असे असताना महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर राखी बोलणार नाही, हे शक्यच नाही.

rakhi sawant new video goes viral on maharashtra government formation |   बोला था ना मैंने...! राखी सावंतने व्हिडीओ शेअर केला; हजारो लोकांनी पाहिला!

  बोला था ना मैंने...! राखी सावंतने व्हिडीओ शेअर केला; हजारो लोकांनी पाहिला!

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून राखी तिच्या सीक्रेट वेडींगमुळे चर्चेत आहे.

मुद्दा कुठलाही असो, राखी सावंतची प्रतिक्रिया येणार नाही, असे शक्यच नाही. देशातच नाही तर जगाच्या कानाकोप-यात कुठेही काहीही घडो, राखी त्यावर बोलणार म्हणजे बोलणार. असे असताना महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर राखी बोलणार नाही, हे शक्यच नाही.
 होय, महाराष्ट्रातील राजकारणाच्या सद्यस्थितीवर राखी सावंतने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राखी राष्ट्रवादी, शिवसेना, काँगे्रस सगळ्यांबद्दल बोलताना दिसतेय. ‘आपसी सहमतीने लवकरात लवकर सरकार बनवा, नाही तर उशीर होईल, असे मी तुम्हाला सांगितले होते ना?’ असे राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसला उद्देशून राखी या व्हिडीओत म्हणतेय. राखीने काल शनिवारी हा व्हिडीओ शेअर केला. आत्तापर्यंत 34 हजारांवर लोकांनी तो पाहिला आहे. 


‘लो कर लो बात बोला था न मैंने, पवार साहब को, शिवसेना को की लडो मत सोचो मत. इतना टाईम नहीं है. देख लो मोदीजी कितने पावरफुल है,’ असे राखी या व्हिडीओत म्हणतेय.
उद्धव ठाकरे यांना उद्देशून ती म्हणतेय, ‘आता हेच बघा उद्धवजी. सीएमची खुर्ची हातची गमावली ना. तुम्ही सीएम व्हावेत, अशी माझी इच्छा होती. मोदींच्या मागे अमित शाहचे डोके आहे. मास्टरमाइंड आहेत, ते यात. गुजराती आहेत ना. सगळ्या गुजराती लोकांचा मेंदू तेज असतो. मी सुद्धा गुजराती आहे.’


गेल्या काही दिवसांपासून राखी तिच्या सीक्रेट वेडींगमुळे चर्चेत आहे. एका एनआरआयशी लग्न केल्याचा दावा राखीने केला आहे. मात्र अद्याप तिच्या या नवºयाचा फोटो समोर आलेला नाही.

Web Title: rakhi sawant new video goes viral on maharashtra government formation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.