'हिंदू धर्मात काय खराबी होती की इस्लाम...'; राखी सावंतच्या उत्तरावर लोक भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 01:39 PM2023-08-31T13:39:25+5:302023-08-31T13:48:20+5:30

जेव्हा आपण निकाह करता, इस्लाम स्वीकारता, तेव्हा तुम्हाला हे सर्व करावे लागते. मी नशीबवान आहे की, मला मक्का आणि मदिना येथून बुलावा आला.

rakhi sawant returns from makka madina paparazzi ask What was wrong with Hinduism rakhis answer video goes viral | 'हिंदू धर्मात काय खराबी होती की इस्लाम...'; राखी सावंतच्या उत्तरावर लोक भडकले

'हिंदू धर्मात काय खराबी होती की इस्लाम...'; राखी सावंतच्या उत्तरावर लोक भडकले

googlenewsNext

बॉलिवुडची ड्रामा क्विन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आदिलसोबतच्या वादादरम्यान ती नुकतीच मक्का-मदीना येथे गेले होती. तेथून मुंबईत परतल्यानंतर, तिला पापाराझीने एअरपोर्टवर घेरले. यावेळी जेव्हा पापाराझींनी तिला राखी म्हणून संबोधले, तेव्हा ती म्हणाली, राखी नव्हे 'फातिमा' म्हणा, आता मी 'फातिमा' आहे. यानंतर माध्यमांनी तिला अचानकपणे एक असा प्रश्न केली की, उत्तर देण्यासाठी तिही काही वेळ विचारात पडली. या दरम्यानचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. 

हिंदू धर्मात काय खराबी होती की... -
राखीने इस्लाम धर्म स्वीकारल्यावरून पापाराझींनी तिला प्रश्न केला की, 'हिंदू धर्मात काय खराबी होती की, इस्लाम स्वीकारला?' यावर उत्तर देताना राखी म्हणाली, 'हिंदू धर्मात काहीही खराबी नाही. मी मुस्लीम धर्मात निकाह केला होता आणि गेल्या एक वर्षापासून आदिलसोबत निकाहात आहे. जेव्हा आपण निकाह करता, इस्लाम स्वीकारता, तेव्हा तुम्हाला हे सर्व करावे लागते. मी नशीबवान आहे की, मला मक्का आणि मदिना येथून बुलावा आला.

युजर्सनी केलं ट्रोल -
राखी सावंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यावर अनेक युजर्स कमेंट करून राखिला ट्रोल करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले, 'ही कधीच हिंदू नव्हती, ही आधी ख्रिश्चन होती.' आणखी एकाने लिहिले, 'निकाह केला म्हणून मुस्लीम झाली, आता तलाक झाला तर ख्रिश्चन बनेल.. तू हिंदू नाही.' आणखीही काही युजर्स अशाच पद्धतीच्या कमेंट करताना दिसत आहेत.
 

 

Web Title: rakhi sawant returns from makka madina paparazzi ask What was wrong with Hinduism rakhis answer video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.