​राखी सावंत म्हणाली, मला राष्ट्रपती बनवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2017 09:17 AM2017-06-21T09:17:22+5:302017-06-21T14:47:22+5:30

ड्रामा क्विन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आहे. होय,  भारताचा राष्ट्रपती बनण्याची इच्छा राखीने व्यक्त केली आहे. बॉलिवूडच्या दुस-या ...

Rakhi Sawant said, make me the President! | ​राखी सावंत म्हणाली, मला राष्ट्रपती बनवा!

​राखी सावंत म्हणाली, मला राष्ट्रपती बनवा!

googlenewsNext
रामा क्विन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आहे. होय,  भारताचा राष्ट्रपती बनण्याची इच्छा राखीने व्यक्त केली आहे. बॉलिवूडच्या दुस-या कुठल्याही स्टारमध्ये इतकी बुद्धी नाही की, तो राष्ट्रपती बनू शकेल. या पदासाठी केवळ मीच एकटी लायक आहे, असे राखीने म्हटले आहे.
आज इंटरनॅशनल योग दिनाच्या निमित्ताने राखी असे काही- बाही बरळली. योग गुरु मंदीप यांच्याकडे राखी योग करायला पोहोचली. यावेळी मीडियाचे लक्ष वेधून घेण्यात राखी एकदम शंभर टक्के यशस्वी झाली. राष्ट्रपती पदाच्य शर्यतीत एखाद्या फिल्मी स्टारचे नाव घ्यायचे झाल्यास, तुझ्यामते, यासाठी कोण लायक आहे? असा प्रश्न राखीला यावेळी विचारला गेला. यानंतर राखीची गाडी अशी काही सूसाट पळत सुटली की, तिला आवरता आवरता अनेकांची पुरेवाट झाली. माझ्या मते, बॉलिवूडचे सगळे स्टार बेक्कल आहेत. राष्ट्रपती बनण्याइतकी कुणाचीही बुद्धी नाही. राष्ट्रपती बनणे ज्याचे काम आहे, त्यानेच बनावे आणि त्यातही कुणाजवळ वेळ नसेल तर मला बनवावे. मी राष्ट्रपती झाले तर देशाचे कल्याणच होईल, असे राखी यावेळी म्हणाली. ज्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्या देशाचे राष्ट्रपती बनायला मला आवडेल, असेही ती म्हणाली. आता राखीला असेच ड्रामा क्विन म्हटले जात नाहीच ना? कदाचित त्याचमुळे तिचा कुठलाही शब्द बॉलिवूडमध्ये फार गंभीरपणे घेतला जात नाही. यापूर्वी आपल्या अनेक विधानांनी राखीने वाद ओढवून घेतले आहेत. तसा राखीला राजकारणात इंटरेस्ट आहेच. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाची ती पदाधिकारी आहे. ती निवडणूकही लढवून चुकली आहे. अर्थात या निवडणुकीत ती दणकून आपटली. या निवडणुकीत ‘तिखट मिर्ची’ हे तिचे निवडणूक चिन्ह होते.

Web Title: Rakhi Sawant said, make me the President!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.