VIDEO : कंगनावर राखी सावंतने केली टीका, लोक म्हणाले - तुझं डोकं ठिकाणावर नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 04:53 PM2020-09-09T16:53:33+5:302020-09-09T16:53:47+5:30
राखी सावंतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात ती म्हणाली आहे की, कंगनासोबत जे काही होत आहे ते चांगलं होत आहे.
बॉलिवूड क्वीन म्हटली जाणारी अभिनेत्री कंगना रनौत सध्या चांगलीच चर्चेत आहे. मुंबईबद्दल अपशब्द काढल्याने कंगना शिवसेनेच्या रडारवर आहे. बुधवारी ती मुंबईत दाखल झाली. पण त्याआधीच बीएमसीने तिच्या ऑफिसवर बुलडोजर चालवला. अशात अभिनेत्री राखी सावंतने कंगनाला असं काही म्हटलंय, ज्यावरून लोक राखीचीच खिल्ली उडवत आहेत.
राखी सावंतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात ती म्हणाली आहे की, कंगनासोबत जे काही होत आहे ते चांगलं होत आहे. राखी सावंतच्या या व्हिडीओत कमेंटबॉक्समध्ये कंगनाचे फॅन्स राखीवर टीका करत आहेत.
हा व्हिडीओ शेअर करत राखी सावंतने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मानवतेला सपोर्ट आणि कंगनाला उत्तर...आपण मनुष्य आहोत, याला जाती-धर्मात विभागू नकी. सूर्याची किरणे आणि चंद्राचा प्रकाश सर्वांवर सारखाच पडतो. आपण सगळे एक आहोत. कुणीही लहान-मोठं नाहीय. सगळे सारखे. आपलं संविधान बेस्ट आहे. ते खराब करण्याची हिंमत करू नका'.
शिवसेना- कंगना वाद शिगेला...
शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत ( Kangana Ranaut) यांच्यातील वाद आता शिगेला गेला आहे. मुंबई महापालिकेनं कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर ( Kangana Ranaut's office) कारवाई केली. या कारवाईचे फोटो ट्विट करत कंगनानं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून जोरदार टीका केली. मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनानं तिच्या ऑफिसमधील व्हिडीओ पोस्ट करून संताप व्यक्त केला.
कंगनानं १२ सेकंदांचं एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये तिच्या पाली हिल येथील कार्यालयात झालेली तोडफोड दिसत आहे. कोसळलेलं छत, मोडलेल्या वस्तू यामध्ये अगदी स्पष्ट दिसत आहेत. 'डेथ ऑफ डेमोक्रसी' अशा तीन शब्दांत कंगनानं तिच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईवर भाष्य केलं आहे. मुंबईत दाखल झालेली कंगना सध्या तिच्या खार येथील निवासस्थानी आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली टीका
''उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं, की तुम्ही बॉलिवूड माफियासोबत मिळून माझं घर उध्वस्त करून बदला घेतला आहेस. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचा हा अहंकार तुटेल. वेळ नेमही एकसारखी नसते. हे करून तुम्ही माझ्यावर उपकार केले.. काश्मीरी पंडितांवर काय संकट आलं असेल हे माहीत होतं, परंतु आज मी ते स्वतः अनुभवलं. आज मी देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्यावर नाही, तर काश्मीर पंडितांवरही चित्रपट तयार करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र,''असं कंगनानं ट्विट केलं.
हे पण वाचा :
Kangana Ranaut : ...कल तेरा घमंड टुटेगा; उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत कंगनाचा संताप, Video
'तुम्ही कंगनाचं ऑफिस तोडू शकता, हिंमत नाही, गीताचा शाब्दीक डाव'
महिला आहे म्हणून काहीही बोलणार? अॅक्शनला रिअॅक्शन मिळणारच, अबू आझमींचा कंगनाला इशारा