५८ वर्षीय पाकिस्तानी मौलानासोबत राखी सावंत थाटणार संसार?, पण भारत-पाकसंदर्भात ठेवली ही अट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 10:09 IST2025-02-12T10:09:04+5:302025-02-12T10:09:54+5:30
Rakhi Sawant : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत अनेकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. दरम्यान पाकिस्तानी धर्मगुरू मुफ्ती अब्दुल कवी यांनी राखीसोबत लग्न करण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली.

५८ वर्षीय पाकिस्तानी मौलानासोबत राखी सावंत थाटणार संसार?, पण भारत-पाकसंदर्भात ठेवली ही अट
बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) अनेकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. गेल्या काही आठवड्यांपासून ती पाकिस्तानची सून बनणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. जेव्हा पाकिस्तानी अभिनेता डोडी खानने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हापासून हे सर्व सुरू झाले. मात्र, हे प्रकरण वाढू लागल्याने त्याने नंतर व्हिडिओच्या माध्यमातून आपले विधान मागे घेतले. अलिकडेच पाकिस्तानी धर्मगुरू मुफ्ती अब्दुल कवी यांनी राखीसोबत लग्न करण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली होती. आता अखेर राखीने उत्तर दिलंय पण त्यांच्यासमोर धक्कादायक अटी ठेवल्या आहेत.
झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत राखीने मुफ्ती अब्दुल कवी यांच्याशी थेट संवाद साधला आणि लग्नासाठी तिच्या काही अटी ठेवल्या आहेत. तिने सुरुवातीला सांगितले होते की जर मुफ्तींना तिच्याशी लग्न करायचे असेल तर तिला सुमारे ६-७ कोटी रुपयांचे कर्ज फेडावे लागेल. कोणतेही आढेवेढे न घेता मुफ्ती अब्दुल कवी यांनी लगेच होकार दिला. आतापासून राखीचे कर्ज ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
मुफ्ती अब्दुल कवीसोबत लग्न करणार राखी सावंत?
राखीला मुफ्ती अब्दुल कवीशी लग्न करायचे आहे का असे विचारले असता राखीने संकोच केला आणि सांगितले की तिला आधी त्यांचे वय माहित असणे आवश्यक आहे. मुफ्ती यांनी उत्तर दिले की ते ५८ वर्षांचे आहेत आणि एकदाच लग्न केले होते. ते आधीच एक पणजोबा आहेत. ते पुढे म्हणाले, 'प्रेम ही अशी गोष्ट आहे ज्यावर वैयक्तिकरित्या चर्चा केली पाहिजे.'
राखीने व्यक्त केली ही इच्छा
मुफ्तींच्या वयाबद्दल समजल्यानंतर राखीने गमतीत म्हटलं की, 'माणूस आणि घोडा कधीच म्हातारा होत नाही.' मात्र, राखीने पैसे मागण्याऐवजी वेगळ्या प्रकारची मागणी केली. तिला भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता आणि मैत्री हवी आहे, असे तिने सांगितले. या कारणासाठी आपण स्वत:चा त्याग करण्यासही तयार असल्याचे तिने जाहीर केले. मुफ्ती अब्दुल कवी यांनी तिला आश्वासन दिले की त्यांच्या लग्नामुळे हे शक्य होईल.