Rakshabandhan Special : ऐश्वर्या राय-सोनू सूदपासून अर्जुन कपूर-कतरिना कैफपर्यंत हे आहेत बॉलिवूडचे भाऊ-बहिण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 12:39 PM2021-08-22T12:39:58+5:302021-08-22T12:48:52+5:30
बॉलिवूडमधील कलाकारांनीदेखील चाहत्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आज देशभरात रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आहे. बॉलिवूडमधील कलाकारांनीदेखील चाहत्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूडमधील सेलिब्रेटीदेखील भावाबहिणींसोबत रक्षाबंधन साजरा करत आहेत आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आज जाणून घेऊयात बॉलिवूडमधील भावाबहिणींबद्दल जाणून घेऊयात.
अर्जुन कपूर आणि कतरिना कैफ एकमेकांचे चांगले फ्रेंड्स आहेत आणि सोबतच अर्जुन कतरिनाचा राखी ब्रदरदेखील आहे. अर्जुनचे त्याची बहिण अशुंलावर खूप प्रेम आहे आणि हे प्रेम कतरिनाला खूप भावते. कतरिना अर्जुनला भाऊ मानते. कतरिना अर्जुनला तेव्हापासून ओळखते जेव्हा अर्जुन सिनेमात आलादेखील नव्हता आणि तेव्हापासून त्यांच्यात भावा बहिणींसारखे नाते आहे.
बिपाशा बासूला भाऊ नाही आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने ती तिच्या भावांची खूप आठवण काढते. तिने इंडस्ट्रीत जास्त नाते बनवले नाहीत मात्र जॉनचा मेकअप आर्टिस्टला भाऊ मानते. जेव्हा बिपाशा आणि जॉन रिलेशनशीपमध्ये होते तेव्हापासून बिपाशा जॉनचा मेकअप आर्टिस्टला राखी बांधते आणि अजूनही हे नाते कायम आहे. सोबतच ती डिझायनर रॉकी एस आणि दिग्दर्शक सोहम शाहला देखील राखी बांधते.
RT @bipsluvurself: Brother from another mother ❤️ Best brother in the whole wide world ❤️#rakhipic.twitter.com/spRxAMTSvf
— Bipasha Basu FanClub (@BipashaFanClub) August 15, 2019
आशुतोष गोवारीकरचा चित्रपट जोधा अकबरमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि सोनू सूद भावाबहिणीच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटादरम्यान ऐश्वर्याने सोनू सूदला राखी बांधली होती आणि तेव्हापासून ते दोघे एकमेकांना भाऊ बहिण मानतात. या दोघांचे रिलेशन तेव्हापासून कायम आहे. सोनू म्हणाला होता की, तो ऐश्वर्याला बहिण मानतो आणि दरवर्षी राखी बांधण्यासाठी तिच्या घरी जातात.
सलमान खान सर्वांचाच भाईजान आहे. पण त्याचे बहिण अलविरा आणि अर्पितावर खूप प्रेम आहे. सलमान खान आपल्या दोन्ही बहिणींकडून राखी बांधून घेतो. तसेच श्वेता रोहिरासोबतदेखील त्याचे भावा बहिणीचे नाते आहे. पुलकित सम्राटची आधीची पत्नी श्रद्धा सलमानला भाऊ मानते आणि त्याला राखी बांधते.