श्रीदेवींच्या २० मिनिटांच्या भूमिकेसाठी रकुल प्रीत सिंगने घेतले इतके कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 20:41 IST2018-10-11T20:39:37+5:302018-10-11T20:41:05+5:30
सुपरस्टार श्रीदेवीची व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करण्याची संधी मिळाल्याने सध्या रकुल जाम आनंदात आहे. याशिवाय आणखी एका गोष्टीचा आनंद आहे. होय, या भूमिकेसाठी रकुलने तगडी फी वसूल केली आहे

श्रीदेवींच्या २० मिनिटांच्या भूमिकेसाठी रकुल प्रीत सिंगने घेतले इतके कोटी!
एन टी रामाराव यांच्या आयुष्यावर बेतलेल्या बायोपिकची घोषणा झाली, तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत आहे. ‘कथानायकुडू’ असे नामकरण करण्यात आलेल्या या चित्रपटात अभिनेत्री रकुल प्रीत सिंग दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. कालचं या चित्रपटातील रकुलचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला. या फर्स्ट लूकमध्ये रकुल हुबेहुब श्रीदेवींसारखी दिसते आहे. सुपरस्टार श्रीदेवीची व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करण्याची संधी मिळाल्याने सध्या रकुल जाम आनंदात आहे. याशिवाय आणखी एका गोष्टीचा आनंद आहे. होय, या भूमिकेसाठी रकुलने तगडी फी वसूल केली आहे.
होय, या बायोपिकमध्ये रकुलची उण्यापुºया २० मिनिटांची भूमिका आहे. पण या २० मिनिटांसाठी रकुलने १ कोटी रूपये फी घेतली आहे.
एनटीआर यांचे बायोपिक एक बिग बजेट चित्रपट आहे. हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित केला जाणार आहे़ पहिला भाग पुढील वर्षी ९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे तर दुसरा भाग पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर येणार आहे. अभिनेत्री विद्या बालन ही सुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. एनटीआर यांच्या पत्नीची भूमिका ती साकारणार आहे. मराठी अभिनेता सचिन खेडेकरही यात महत्त्वपूर्ण भूमिका वठवणार आहे. याशिवाय बाहुबली फेम राणा डग्गुबती यात एका राजकीय नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
राजकारणासोबतच अभिनयातही नाव कमवलेले एनटीआर यांच्या जीवनप्रवासावर आधारित हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदी भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिश करणार असून बालाकृष्णा, विष्णू वर्धन आणि साई कोरापटी निर्माते आहेत.