लग्नानंतर हनीमूनला जाणार नाही रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी, काय आहे कारण....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 12:41 IST2024-02-16T12:39:22+5:302024-02-16T12:41:32+5:30
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh )आणि निर्माता जॅकी भगनानी (Jacky Bhagnani) सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. ...

लग्नानंतर हनीमूनला जाणार नाही रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी, काय आहे कारण....
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh )आणि निर्माता जॅकी भगनानी (Jacky Bhagnani) सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. गोव्यामध्ये या कपलचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यामुळे चाहत्यांना रकुल आणि जॅकी हनीमूनला कुठे जाणार असा प्रश्न पडला आहे. पण हे दोघे लग्नानंतर आता हनीमूनला जाणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.
रकुल आणि जॅकी यांनी हनीमूनला जाण्याच्या कोणत्याच प्लानचं नियोजन केलं नाही. दोघे कदाचित हनीमूनला जाणार नाहीत. दोघेही आपल्या राहिलेल्या कामावर लक्ष केंद्रित करणार आहेत, त्यामुळे त्यांनी हनीमूनला जायचा कोणताच प्लान केला नाही. रकुल तिच्या एका आगामी सिनेमाचं शुटिंग करणार आहे. तर जॅकी भगनानी हा निर्माता म्हणून अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या 'बडे मियाँ और छोटे मियाँ' या चित्रपटामुळे व्यस्त असेल. अशा परिस्थितीत दोघेही त्यांचे हनिमून प्लॅन रद्द करू शकतात. काम संपल्यावर ते हनीमूनला जातील, अशी शक्यता आहे.
रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी या महिन्याच्या २२ तारखेला लग्न करणार आहेत. १९ फेब्रुवारीपासून लग्नसोहळा सुरू होणार आहे. विशेष म्हणजे या कपलचं गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे. या जोडप्याने आधी परदेशात डेस्टिनेशन वेडिंग करण्याचं ठरवलं होतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना भारतातच लग्न समारंभ आयोजित करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर रकुल प्रीत सिंग आणि जॅकीनं आपला निर्णय बदलला.
रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी या दोघांची लव्हस्टोरी लॉकडाउनमध्ये सुरू झालेली. रकुल आणि जॅकी अनेक वर्षांपासून एकमेकांचे शेजारी होते, मात्र शेजारी राहूनही दोघं एकमेकांना कधीही भेटले नव्हते. लॉकडाऊन दरम्यान दोघे कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून भेटले. त्यानंतर दोघांच्या मैत्रीतील प्रेमात रूपांतर झालं आणि आता या दोघांच्या लग्नासाठी त्यांचे खूपच उत्सुक आहेत.