‘मीडिया ट्रायल’ला वैतागली रकुल प्रीत सिंह, मदतीसाठी पुन्हा हायकोर्टात धाव 

By रूपाली मुधोळकर | Published: September 27, 2020 12:11 PM2020-09-27T12:11:44+5:302020-09-27T12:12:08+5:30

होय, मी रियासोबत चॅट केले, एनसीबीपुडे दिली होती कबुली!!

rakul preet singh moved delhi high court seeking interim direction to media does not broadcast or publish news to her in drug case | ‘मीडिया ट्रायल’ला वैतागली रकुल प्रीत सिंह, मदतीसाठी पुन्हा हायकोर्टात धाव 

‘मीडिया ट्रायल’ला वैतागली रकुल प्रीत सिंह, मदतीसाठी पुन्हा हायकोर्टात धाव 

googlenewsNext
ठळक मुद्देरकुल टॉलिवूडची महागडी अभिनेत्री आहे. बॉलिवूडमध्येही तिचा दबदबा आहे.

ड्रग्ज प्रकरणात अडकलेली बॉलिवूड व साऊथ अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने पुन्हा एकदा दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रकुलने दिल्ल्ली उच्च न्यायालयात पुन्हा एक याचिका दाखल केली आहे. ड्रग्ज केससंदर्भात आपल्याविरोधात कुठलाही लेख वा कार्यक्रम प्रसारित करण्याची अनुमती मीडियाला नाकारण्यात यावी, असा अंतरिम आदेश देण्याची मागणी रकुलने या याचिकेत केली आहे.

ड्रग्जप्रकरणात अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नावे समोर येतात, मीडियाने हे प्रकरण लावून धरले आहे. मीडिया व चाहत्यांच्या नजरा एनसीबीच्या चौकशीवर आहेत. सोशल मीडिया व मीडियाच्या माध्यमातून ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्यांविरोधात रोज नवे खुलासे, दावे होत आहेत. यात दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान या तिघींसोबतच रकुलचेही नाव आहे. मात्र या मीडिया ट्रायलमुळे आपल्या इमेजवर वाईट परिणाम होत असल्याचे रकुलचे म्हणणे आहे. त्यामुळे कोर्टाने तिच्याविरोधात सुरु असलेले हे मीडिया ट्रायल रोखण्याचे अंतरिम आदेश द्यावे, अशी मागणी तिने याचिकेत केली आहे.

यापूर्वीही दाखल केली आहे याचिका
याआधी सुशांत सिंग राजपूत प्रकरणात नाव येताच रकुलने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने  प्रसारमाध्यमांनी या प्रकरणात आपले नाव घेऊ नये, असे निर्देश द्यावेत, अशी मागणी तिने या याचिकेत केली होती. याबद्दल माहिती व प्रसारण मंत्रालयाला आदेश द्यावेत असेही ती म्हणाली होती.

in Pics: एक्स्ट्रा पॉकेटमनीसाठी चित्रपटांत आली होती रकुलप्रीत सिंह, ट्रेनिंग जिममधून करते बम्पर कमाई

होय, मीच रियासोबत ड्रग्जबद्दल चॅट केलं, पण...; रकुल प्रीतकडून ब्लेमगेम सुरू?

एनसीबी चौकशीत केला खुलासा
ड्रग्जप्रकरणी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह  एनसीबीपुढे हजर झाली होती. त्याआधी समन्स मिळालाच नाही, असा कांगावा तिने केला होता़. पण मग एनसीबीने फटकारल्यानंतर चौकशीसाठी हजर झाली होती. मी ड्रग्ज घेत नाही. ड्रग्ज विक्रेत्यांशी माझा कोणताही संबंध नाही, असा दावा तिने यावेळी केला होता.  2018 मध्ये रियासोबत ड्रग्जविषयी बोलले होते, अशी कबुली मात्र तिने दिली होती. मात्र ही कबुली देताना सगळे खापर रियाच्या डोक्यावर फोडले़ होते. रिया चॅटच्या माध्यमातून तिचे सामान (ड्रग्ज) मागवत होती. तिचे सामान माझ्या घरी होते, असा जबाब तिने नोंदवला होता.
रकुल टॉलिवूडची महागडी अभिनेत्री आहे. बॉलिवूडमध्येही तिचा दबदबा आहे.
‘यारियां’ हा बॉलिवूडचा तिचा पहिला सिनेमा. 2018 मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती ‘अय्यारी’मध्ये झळकली आणि पाठोपाठ अजय देवगणसोबत ‘दे दे प्यार दे’ हा सिनेमा तिला मिळाला. ‘दे दे प्यार दे’ हा तिचा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमाने रकुलला बॉलिवूडमध्ये नाव दिले, पैसा दिला, ग्लॅमर दिले.

 

Web Title: rakul preet singh moved delhi high court seeking interim direction to media does not broadcast or publish news to her in drug case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.