रकुल प्रीत सिंग एनटीआर बायोपिकमध्ये साकारणार ही भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 17:51 IST2018-10-10T17:49:23+5:302018-10-10T17:51:13+5:30
यारियां फेम अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने एन. टी. आर यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट कथानायकुडू’चा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात ती श्रीदेवीच्या लूकमध्ये दिसत आहे.

रकुल प्रीत सिंग एनटीआर बायोपिकमध्ये साकारणार ही भूमिका
यारियां फेम अभिनेत्री रकुल प्रीत सिंग नुकतीच अय्यारी सिनेमात झळकली. या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतूक झाले. त्यानंतर आता ती तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते व आंध्रप्रदेशमधील लोकांच्या देवस्थानी असलेले नेते एन. टी. रामाराव यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटात दिसणार आहे. कथानायकुडू असे या सिनेमाचे नाव असून यात ती दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यानंतर आता रकुलचा या सिनेमातील लूक सादर करण्यात आला आहे. रकुल प्रीत सिंगने नुकताच 28वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने तिने या सिनेमातील लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टरवर ती श्रीदेवीच्या अंदाजात दिसते आहे. त्यात तिने सफेद रंगाची साडी व टिकली लावलेली असून ती श्रीदेवीसारखी उभी आहे.
Presenting first look of #sridevigaru in #ntrbiopic !! ❤️ hope you like it !
304.6k Likes, 3,159 Comments - Rakul Singh (@rakulpreet) on Instagram: "Presenting first look of #sridevigaru in #ntrbiopic !! ❤️ hope you like it !"
कथानायकुडू चित्रपटात रकुल प्रीत सिंगचा लूकला रसिकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. रकुलच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज खूप भावला आहे. तर काही लोक तिची श्रीदेवीच्या रोलसाठी निवड केल्यामुळे नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत रकुल प्रीत सिंग म्हणाली की, या प्रोजेक्टबाबत मी खूप उत्सुक आहे. मला माहित आहे की सगळ्यांचे लक्ष माझ्या रोलकडे असणार आहे कारण मी श्रीदेवीची भूमिका करते आहे.
राजकारणासोबतच अभिनयातही नाव कमवलेले एनटीआर यांच्या जीवनप्रवासावर आधारित हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदी भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बालाकृष्णा, विष्णू वर्धन आणि साई कोरापटी करणार असून निर्माते क्रिश आहेत. हा चित्रपट ९ जानेवारी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.