रकुल प्रीतला झाली कोरोनाची लागण, गेल्याच महिन्यात मालदीव्हज व्हॅकेशनमुळे होती चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 03:50 PM2020-12-22T15:50:41+5:302020-12-22T15:55:45+5:30
यारियां’ हा बॉलिवूडचा तिचा पहिला सिनेमा होता. 2018 मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती ‘अय्यारी’मध्ये झळकली आणि पाठोपाठ अजय देवगणसोबत ‘दे दे प्यार दे’ हा सिनेमा तिला मिळाला.
रकुल प्रीत सिंहला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर माहिती दिली असून सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. तिच्या संपर्कात आलेल्या लोकांनीही कोरोना टेस्ट करुन घ्यावी असे तिने सांगितले आहे. मी ठीक असून काळजी करण्याचं कारण नाही असं रकुलने सांगितलं आहे.
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. इंडस्ट्रीमध्येही गेल्या काही महिन्यात कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यामध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय बच्चन, सनी देओल अनेक कलाकारांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती.
गेल्याच महिन्यात रकुल मस्त व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसली. व्हॅकेशन दरम्यानचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मालदीव्हजमध्ये ती व्हकेशनसाठी गेली होती. रकुल टॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेत्री असून मानधनातही महागडी अभिनेत्री आहे. बॉलिवूडमध्ये तिच्या वाट्याला फारसे यश आले नसले तरीही या गोष्टीचा फरक तिला पडत नाही.
‘यारियां’ हा बॉलिवूडचा तिचा पहिला सिनेमा होता. 2018 मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती ‘अय्यारी’मध्ये झळकली आणि पाठोपाठ अजय देवगणसोबत ‘दे दे प्यार दे’ हा सिनेमा तिला मिळाला. ‘दे दे प्यार दे’ हा तिचा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमाने रकुलला बॉलिवूडमध्ये नाव दिले, पैसा , प्रसिद्धी आणि प्रतिष्ठाही मिळवून दिली.
२०२० मध्ये रकुल तिच्या सिनेमांमुळे नाही तर वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत होती. बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात रकुलचेही नाव समोल आले होते. मी ड्रग्ज घेत नाही. ड्रग्ज विक्रेत्यांशी माझा कोणताही संबंध नाही, असा दावा तिने यावेळी केला होता.
2018 मध्ये रियासोबत ड्रग्जविषयी बोलले होते, अशी कबुली मात्र तिने दिली होती. मात्र ही कबुली देताना सगळे खापर रियाच्या डोक्यावर फोडले होते. रिया चॅटच्या माध्यमातून तिचे सामान (ड्रग्ज) मागवत होती. तिचे सामान माझ्या घरी होते, असा जबाब तिने नोंदवला होता.