RRR Box Office Collection Day 11: जगभर 921 कोटी कमावणाऱ्या ‘RRR’ला 11 व्या दिवशी बसला पहिला मोठा झटका, वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 05:31 PM2022-04-06T17:31:59+5:302022-04-06T17:33:28+5:30
RRR Box Office Collection Day 11: गेली 10 दिवस डबल डिजिटमध्ये कमाई करणाऱ्या सिनेमाची कमाई आता सिंगल डिजिटवर पोहोचली आहे.
RRR Box Office Collection Day 11: राम चरण, ज्युनिअर एनटीआर, आलिया भट, अजय देवगण स्टारर ‘आरआरआर’ (RRR) या सिनेमानं जगभर 900 कोटींवर बिझनेस केला. पण रिलीजच्या 11 व्या दिवशी 900 कोटी कमावणाऱ्या या चित्रपटाला पहिल्यांदा मोठा झटका बसला. होय, ‘आरआरआर’च्या हिंदी व्हर्जनला 11 व्या दिवशी अपेक्षेपेक्षा बराच कमी प्रतिसाद मिळाला. सोमवारी या चित्रपटाने फक्त 7 कोटींची कमाई केली आणि काल मंगळवारी कमाईत आणखीच घट दिसली. गेली 10 दिवस डबल डिजिटमध्ये कमाई करणाऱ्या सिनेमाची कमाई आता सिंगल डिजिटवर पोहोचली आहे.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ताज्या कमाईचे आकडे शेअर केले आहे. गेल्या रविवारी ‘आरआरआर’च्या हिंदी व्हर्जनने 20.50 ची घसघशीत कमाई केली होती. पण दुसऱ्याच दिवशी सोमवारी कमाईचा हा आकडा 7 कोटींवर आला. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, आधीच्या तुलनेत आता ‘आरआरआर’च्या हिंदी व्हर्जनच्या कलेक्शनमध्ये जवळ जवळ 45 टक्के घसरण झालेली दिसून आली आहे. आत्तापर्यंत ‘आरआरआर’च्या हिंदी व्हर्जनने एकूण 198.09 कोटींचा बिझनेस केला आहे.
#RRR is steady on weekdays... Will cross ₹ 200 cr today [second Wed]... An open week - till the biggies arrive on 14 April - will help accumulate a strong total... [Week 2] Fri 13.50 cr, Sat 18 cr, Sun 20.50 cr, Mon 7 cr, Tue 6.50 cr. Total: ₹ 198.09 cr. #India biz. pic.twitter.com/FWB7zJmGAT
— taran adarsh (@taran_adarsh) April 6, 2022
वर्ल्डवाइड कमाई पोहोचली 921 कोटींवर
हिंदी व्हर्जनच्या कमाईत घट झाली असली तरी अद्यापही ‘आरआरआर’ वर्ल्डवाइड चांगली कामगिरी करतोय. ‘आरआरआर’ची एकूण वर्ल्डवाइड बिझनेस 921 कोटींवर पोहोचला आहे. रविवारी या चित्रपटाने वर्ल्डवाइड 82.40 कोटींचा बिझनेस केला होता. सोमवारी 20.34 कोटींचा गल्ला जमावला. याचसोबत ‘आरआरआर’ हा वर्ल्डवाइड सर्वाधिक कमाई करणारा 5 वा चित्रपट बनला आहे.
एस. एस. राजमौलींच्या ‘आरआरआर’ला तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड व हिंदी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘आरआरआर’ने दक्षिण भारतासोबतच उत्तर भारतातही जबरदस्त बिझनेस केला आहे. पण आता कमाईचा वेग मंदावला आहे. येत्या 13 तारखेला थलापति विजयचा ‘बीस्ट’ रिलीज होतोय. दुस-याच दिवशी ‘केजीएफ 2’ चित्रपटगृहांत धडकणार आहे. या दोन चित्रपटांसमोर ‘आरआरआर’ किती तग धरून राहतो, ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.