बाबो! राम चरणने वाढवली फी, ‘या’ चित्रपटासाठी घेतले इतके कोटी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 05:13 PM2021-12-26T17:13:24+5:302021-12-26T17:14:41+5:30

‘आरआरआर’ हा चित्रपट अद्याप प्रदर्शित व्हायचा आहे. पण त्याआधीच Ram Charan चा भाव वाढला आहे. होय,साऊथ सुपरस्टार राम चरण सर्वाधिक महाग अभिनेत्यांच्या यादीत सामील झाला आहे.

Ram Charan increased the fees after taking 45 crores for RRR | बाबो! राम चरणने वाढवली फी, ‘या’ चित्रपटासाठी घेतले इतके कोटी!!

बाबो! राम चरणने वाढवली फी, ‘या’ चित्रपटासाठी घेतले इतके कोटी!!

googlenewsNext

‘आरआरआर’ (RRR) हा चित्रपट अद्याप प्रदर्शित व्हायचा आहे. पण त्याआधीच  या चित्रपटात एक मुख्य भूमिका साकारणारा राम चरण याचे भाव वाढले आहेत. होय,साऊथ सुपरस्टार राम चरण (Ram Charan ) सर्वाधिक महाग अभिनेत्यांच्या यादीत सामील झाला आहे.

‘आरआरआर’ या एस. एस. राजमौली यांच्या सिनेमासाठी राम चरणने 45 कोटी रूपये चार्ज केल्याचे कळते. पण आता त्याच्या मानधनाचा आकडा एकदम दामदुप्पट झाला आहे. होय, एका रिपोर्टनुसार ‘आरसी 15’ आणि ‘आरसी 16’ या दोन्ही सिनेमांसाठी राम चरणने प्रत्येकी 100 कोटी रूपये फी घेतली आहे.
या चित्रपटात रामचरण बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.

‘आरआरआर’नंतर रामचरण प्रचंड डिमांडमध्ये आहे. निर्माते त्याला अधी मागेल ती रक्कम द्यायला तयार आहेत. तसेही रामचरणने आत्तापर्यंत अधिकाधिक हिट सिनेमे दिले आहेत.अभिनेता राम चरण हा प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी यांचा मुलगा आहे. मात्र तरीही राम चरणने मेहनतीच्या जोरावर स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली. तुमच्या अंगी कला असेल तर यश, पैसा आणि प्रसिद्धी नक्की मिळते, हेच राम चरणनेही  सिद्ध करून दाखवलं. 

दक्षिणेचा सुपरस्टार बनण्यासाठी राम चरणला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. सुरुवातीच्या दिवसांत काम करताना त्यालाही ब-याच अडचणींचा सामना करावा लागला. फायटिंग, डान्स आणि आत्मविश्वासाची कमतरता यामुळे  एखादा सीन शूट करताना त्याला बराच त्रास व्हायचा. वडिलांपेक्षा स्वत:ची वेगळी ओळख कशी निर्माण करता येईल यासाठी राम चरणनने वेळोवेळी वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेतलं आणि आज  आघाडीचा अभिनेता बनत त्याने सा-यांची मनं जिंकलीत. 
 

Web Title: Ram Charan increased the fees after taking 45 crores for RRR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.