Ram Charan Mother In Law : रामचरणच्या सासूबाईंनी भररस्त्यात ‘नाटू नाटू’ गाण्यावर केला डान्स, पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 11:51 AM2023-01-20T11:51:24+5:302023-01-20T11:52:55+5:30
Ram Charan Mother In Law Dance On Rrr Naatu Naatu Song: रामचरणच्या ‘नाटू नाटू’ गाण्याला नुकतंच गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सध्या या गाण्याची जगभर चर्चा आहे. मग काय, रामचरणच्या सासूबाईंनाही या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरता आला नाही.
Ram Charan Mother In Law Dance On Rrr Naatu Naatu Song: साऊथ सुपरस्टार रामचरण सध्या जाम आनंदात आहे. केवळ तोच नाही तर त्याचे सगळे चाहते, त्याचे कुटुंबीय सगळ्यांचा आनंद ओसंडून वाहतोय. रामचरणच्या ‘नाटू नाटू’ गाण्याला नुकतंच गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सध्या या गाण्याची जगभर चर्चा आहे. मग काय, रामचरणच्या सासूबाईंनाही या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरता आला नाही.
होय, रामचरणची सासूबाई शोभना कामिनेनी अलीकडे जावयाच्या ‘नाटू नाटू’ या गाण्याची हुक स्टेप करताना दिसल्या. रामचरणची पत्नी उपासना हिने स्वित्झर्लंडच्या दावोस येथील रस्त्यावरचा आईचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हेरी प्राऊउ मदर इन लॉ... नाटू नाटू इन दावोस... लव्ह यू मॉम..., असं उपासनाने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे. या व्हिडीओत उपासनाची आई ‘नाटू नाटू’ गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
Very proud mother in law - #NatuNatu in Davos ❤️🤩
— Upasana Konidela (@upasanakonidela) January 18, 2023
Love mom @shobanakaminenihttps://t.co/yBc6CI4f79
रामचरणच्या सासूबाईचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. रामचरणची सासूबाई अपोलो रूग्णालयाच्या कार्यकारी उपाध्यक्ष आहेत. जावयाच्या आरआरआर या सिनेमाची जगभर प्रशंसा होत आहे. हे पाहून त्यांचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे. जावयाचं कौतुक करताना त्या थकत नाहीयेत.
प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांचा ‘RRR’ हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारांसाठी शॉर्टलिस्ट झाला आहे. त्यानंतर याच चित्रपटाच्या ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्गसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. गोल्डन ग्लोब्समध्ये RRR चित्रपटाचं प्रतिनिधीत्व दिग्दर्शक एसएस राजामौली, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी केलं. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी १९२० मधील ब्रिटिशकालीन भारतातील स्वतंत्र सेनानी कोमाराम भीम आणि अल्लूरी सीतारामाराजू यांच्या भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्यासह ब्रिटीश कलाकार रे स्टीवेन्सन, एलिसन डूडी आणि ओलिविया मॉरिस यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.