अन् वडील चिरंजीवींना मिठी मारून ढसाढसा रडला RRR फेम राम चरण, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 05:39 PM2022-04-21T17:39:44+5:302022-04-21T17:47:33+5:30

राजामौली यांच्या 'आरआरआर' या चित्रपटाने संपूर्ण भारतात धुमाकूळ घातला आहे. ज्युनिअर एनटीएआर आणि राम चरण यांच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले.

Ram charan started crying after hugged his father chiranjeevi in acharya see photo | अन् वडील चिरंजीवींना मिठी मारून ढसाढसा रडला RRR फेम राम चरण, जाणून घ्या कारण

अन् वडील चिरंजीवींना मिठी मारून ढसाढसा रडला RRR फेम राम चरण, जाणून घ्या कारण

googlenewsNext

राजामौली यांच्या 'आरआरआर' या चित्रपटाने संपूर्ण भारतात धुमाकूळ घातला आहे. राम चरण सध्या त्याच्या आगामी 'आचार्य' चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. अलीकडेच एका पत्रकाराशी संवाद साधताना' या अभिनेत्याने सांगितले की 'आचार्य' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वडील मेगास्टार चिरंजीवी यांच्यासोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट केला. 

दरम्यान तो ज्या-ज्या ठिकाणी भेट देतो त्या-त्या ठिकाणी उपस्थितांना ‘आचार्य’ पाहण्याचे आवाहनही करतो. या चित्रपटात चरण त्याचे रिअल लाईफ पिता आणि ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवीसोबत दिसणार आहे.  राम चरण म्हणाले, राम चरणला सेटवरील प्रत्येक क्षणाला वडिलांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. शूटिंग दरम्यान एक क्षण असा आला होता की आपण खूप भावूक झाल्याचं त्याने सांगितलं. पुढे राम चरण म्हणाला, बाबा आणि मी एकत्र जेवायचो आणि दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा एकत्र काम करायचो. शूटिंगचा भाग आटोपून घरी परतण्यापूर्वी आम्ही सेटवर वेळ घालवला. मला असे वाटले की मला या क्षण आयुष्यभर साठवून ठेवणं आवश्यक आहे, पण मी ते शब्दांत सांगू शकत नाही. ''

काही दिवस एकत्र काम केल्यानंतर वडील चिरंजीवी राम चरणाला म्हणाले, चरण आपण हे क्षण पुन्हा कधीच जगू शकणार नाही. एकाच सेटवर काम करणे आणि एकत्र वेळ घालवणे किती छान आहे.  राम चरण म्हणाला, वडिलांचे हे बोलणं ऐकताच मी त्यांना मीठी मारली आणि रडू लागलो. 
 

Web Title: Ram charan started crying after hugged his father chiranjeevi in acharya see photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.